शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

बिलोली - येथील अमोलनगर भागातील ११ केव्हीहून जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे पोल गांधीनगर, रवींद्रनगर या भागातून नेण्यासाठी कंत्राटदारांनी खड्ड्यांचे खोदकाम सुरू ...

बिलोली - येथील अमोलनगर भागातील ११ केव्हीहून जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे पोल गांधीनगर, रवींद्रनगर या भागातून नेण्यासाठी कंत्राटदारांनी खड्ड्यांचे खोदकाम सुरू केले आहे. या खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बहुसंख्य पोल हे मुख्य रस्त्यालगत करण्यात येत असल्यामुळे रस्त्याची रूंदी कमी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

मनमानी भावाने बियाणे विक्री

बरबडा - बरबडा व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खत व बियाणांची गरज असल्याने कृषी दुकानांवर गर्दी होत आहे. मात्र, सरकारने खतांच्या किमतीत वाढ केल्यामुळे कृषी दुकानदारांनी खते व बियाणांचा तुटवडा असल्याचे दाखवून मनमानी भाव लावून शेतकऱ्यांची लूट चालवली आहे. ही लूट थांबविण्याची मागणी गजानन शिंदे, संभाजी पाटील शिंदे, माणिक चव्हाण, सुनील लुंगारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे बांगडी व्यवसाय संकटात

नरसीफाटा - सलग दुसऱ्या वर्षीही बांगडी व्यवसाय संकटात सापडला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून इतर व्यवसाय करता येतात; परंतु बांगडी व्यवसाय मात्र सुरक्षित अंतर ठेवून करता येत नसल्यामुळे बांगडी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या लग्नसराईत हा व्यवसाय बंद असल्यामुळे बांगडी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

इंटरनेट बँकिकंगची सुविधा सुरू करा

किनवट - भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांची संख्या पाहता इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे ग्राहकांना बँकेत न जाता अनेक व्यवहार करता यावेत, बँकेत गर्दी निर्माण होऊ नये, या दृष्टीने या सुविधेचा लाभ देण्यात आला परंतु किनवट येथील भारतीय स्टेट बँकेने या सुविधेपासून ग्राहकांना वंचित ठेवले आहे. ही सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.

राजगड तलावाला भेट

किनवट - उपविभागीय अधिकारी कार्यालय व लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग किनवटद्वारे किनवट व माहूर तालुक्यातील सिंचन तलाव, पाणर तलाव यांचे लोकसहभागातून गाळ उपसा करण्यासाठी ९ एप्रिलला आवाहन केले होते; परंतु या आवाहनास राजगड येथील तलावाचा समावेश नव्हता. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी या तलावाला भेट देऊन पाहणी केली.

कुंडलवाडीत निर्जंतुकीकरण फवारणी

कुंडलवाडी - शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे माजी आ. सुभाष साबणे यांच्या पुढाकारातून १७ मे रोजी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दुसऱ्या लाटेत मोठी संख्या वाढली होती. देगलूर-बिलोली मतदारसंघात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन त्यात अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुंडलवाडीत निर्जंतुकीकरण करण्यात आले.

दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष

बिलोली - जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दूरसंचार विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील जनतेने याबाबत दूरसंचार विभागाच्या अडचणीविषयी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. बीएसएनएल सेवेविषयी नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला. केबलचे दुरुस्तीचे कारण देऊन वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

एनएचएमआय अंतर्गत कामे

लोहा - एनएचएमआय अंतर्गत लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत फुटपाथसहीत चौपदरीकरण रस्ता होणार असल्याची माहिती खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. लोहा तालुक्यातील नांदेड-लोहा महामार्गावर कारेगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, एनएचएमआय अंतर्गत कामांना गती देण्यात आली आहे.

खते खरेदी करताना जागरूक रहावे

कंधार - खरीप हंगामात कृषी निविष्ठा मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना जागरूक राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य देण्यात यावे, बनावट भेसळयुक्त बियाणे, खते खरेदी टाळण्यासाठी विक्रेत्याकडून पावतीसह कृषी निविष्टांची खरेदी करणे आवश्यक आहे.

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा

बिलोली - यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याने तालुका पातळीवर सर्व विभागप्रमुखांनी खबरदारीचा उपाय म्हणून मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावे, अशी सूचना तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहे. मंगळवारी येथील तहसील कार्यालयात गटविकास अधिकारी, तालुका कृषी कार्यालय, वीज वितरण विभाग व अन्य विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.

सिडकोत गढूळ पाणी

नांदेड - सिडको नवीन नांदेडला गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला. गढूळ आणि मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने भरावे लागत आहे. काही भागांत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागले. एकीकडे कोरोनाची भीती असताना नागरिक मात्र पाण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.

मिरेवाड यांच्या काव्यसंग्रहास पुरस्कार

नायगाव - प्रसिद्ध कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या माती शाबूत राहावी म्हणून या काव्यसंग्रहास पुणे येथील विष्णुपंत ताम्हणे विद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा हडपसर येथे कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केली. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे. या यशाबद्दल मिरेवाड यांचे स्वागत होत आहे.