शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! वापरलेल्या पीपीई कीट नांदेडमध्ये कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:20 IST

रूग्णालय परिसरातील पीएम रूम शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो़ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वापरलेले मास्क, सलाईन, पीपीई कीट आढळून आल्या़ 

ठळक मुद्देपरिसरात स्वच्छता नसल्याने डुकरांचा मुक्त संचार रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना घाणीचा सामना करावा लागतो

- श्रीनिवास भोसलेनांदेड : नांदेडसह शेजारील हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतून अत्यावश्यक सेवांसाठी नांदेडचे शासकीय रुग्णालय गाठणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना येथील घाणीचा सामना करावा लागत आहे़  शासकीय रुग्णालय परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वापरलेल्या पीपीई कीट, ओपीडी कीट, सलाईन व इतर औषधांच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

या रूग्णालयामध्ये नांदेडसह परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो रूग्ण दररोज उपचारासाठी येतात़ परंतु, मागील काही दिवसांपासून शासकीय रूग्णालयातील रूग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत असल्याच्या तक्रारीही रूग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत़ त्याचबरोबर परिसरात स्वच्छता नसल्याने डुकरांचा मुक्त संचार आहे़ ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरूवारी आढावा घेतला असता रूग्णालय इमारत आणि चहूबाजूंनी घाणीचे साम्राज्य होते़ रुग्णालयात ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी कुंड्या ठेवलेल्या आहेत़ परंतु, सदर कचरा रूग्णालय परिसरातील पीएम रूम शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो़ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वापरलेले मास्क, सलाईन, पीपीई कीट आढळून आल्या़ 

योग्य ती कार्यवाही लवकरच करूडॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक ती औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे़  कोणी औषधी लिहून देत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल़ वापरलेल्या पीपीई कीट नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे़ स्वच्छतेचे काम खाजगी कंत्राटदारास दिले आहे. बाहेरील स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही लवकरच करू. - डॉ़ चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड