शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत शिजला साप; ८० विद्यार्थी बालंबाल बचावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 14:10 IST

खिचडी शिजविणाऱ्या महिलांच्या व शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़ 

ठळक मुद्देएका विद्यार्थ्याच्या ताटात साप आल्याने त्याने ही बाब संबंधितांच्या  निदर्शनास आणून दिली़शाळेच्या कारभाराबद्दल पालकांचा संताप

हदगाव (जि. नांदेड) : तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी  खिचडीमध्ये चक्क साप आढळला़ एका विद्यार्थ्याच्या ताटात साप आल्याने त्याने ही बाब संबंधितांच्या  निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे ८० विद्यार्थ्यांचा जीव वाचला़ खिचडी शिजविणाऱ्या महिलांच्या व शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़ 

गारगव्हाण जि़ प़ शाळेत ३० जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे शाळेच्या प्रांगणातील किचनशेडमध्ये खिचडी शिजविण्यात आली़ दुपारी १ वाजता शाळा सुटल्यानंतर मुले खिचडी घेण्यासाठी रांगेत उभे राहिले़   अंजली जाधव, अभिषेक सुरोशे, कृष्णा तांबारे या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली़ यावेळी कृष्णा तांबारे या विद्यार्थ्याच्या ताटातच खिचडीमध्ये शिजलेला साप दिसून आला़ त्याने तो संबंधित महिलेस दाखविला़ त्यांनी लगेच साप चुलीमध्ये फेकला़ तसेच खिचडी मुलांच्या हातातून परत घेत आज खिचडी नाही म्हणून सांगितले़ नंतर शिजवलेली खिचडी फेकून दिली. 

शाळेत खिचडी न दिल्यामुळे विद्यार्थी घरी गेले़ त्यांनी हा प्रकार  पालकांना सांगितला़ त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारला़ खिचडी शिजविणारी महिला लताबाई कैलास सावतकर यांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शिक्षकांनी सापच असल्याचे कबूल केले़ संबंधित खिचडी तपासत नसल्याचे यातून दिसून आले. तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी  कित्येक दिवसांपासून धुतली नसल्याने पालकांनी  मुख्याध्यापक प्रवीण बडेराव यांच्याविरोधसात संताप व्यक्त केला.

शाळेच्या कारभाराबद्दल संतापगारगव्हाण येथील जि़ प़ शाळेची इमारत जुनीच असून शाळा शेतामध्ये आहे़ शाळेत १०१ विद्यार्थीसंख्या आहे़ शाळेत ४ शिक्षक आहेत़ त्यापैकी दोन शिक्षक रजेवर होते़ उपस्थित शिक्षकांनी किचनशेडमध्ये जाऊन खिचडी खाऊन पाहण्याची काळजी घेतली नसल्याचे उघड झाले़ त्या विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे ८० विद्यार्थी बालंबाल बचावले़ अनेक पालकांनी यावेळी शाळेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला़ याप्रकरणी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याचे सांगण्यात आले़ 

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाNandedनांदेड