शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ;अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे नांदेडमध्ये मसाल्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:31 IST

अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे हळद पावडर, कस्तुरी मेथी, धनिया पावडर आदी प्रकारच्या मसाले पदार्थांची पॅकिंग करून ती विक्री केली

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाची धाड ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : शहरात अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांच्या नावे मसाले पदार्थांची पॅकिंग करून विक्री करणाऱ्या श्रीकृष्णा फुडस् या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली़ या कारवाईत मसाले पदार्थांसह इतर साहित्य असा जवळपास ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली़ 

नांदेड शहरातील जुना कौठा भागात असलेल्या वृंदावननगर येथील श्री कृष्णा फुडस्चे मालक नंदकिशोर कमलकिशोर झंवर हे अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांच्या नावे मसाले पदार्थांची पॅकिंग करून विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती़ त्यानूसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांच्यासह पथकाने गुरूवारी जुना कौठा भागातील श्री कृष्णा फुडस् येथे धाड टाकून तेथून विविध बँ्रडच्या नावे असलेले मसाले पदार्थ जप्त केले़ यावेळी प्रभात बॅ्रंड, महेश फुड्स कंपनी आदी नावाने असलेले धनिया पावडर, कस्तुरी मेथी, हळद पावडर आदी जप्त करण्यात आले़ 

ज्या नावाने मसाले पदार्थ पॅकिंग करून विक्री केले जात होते़ त्या नावाच्या कंपन्या नांदेड शहरात अस्तित्वातच नसल्याची बाब तपासात पुढे आली आहे़ त्यानंतर  अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी विविध पदार्थांची नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़  सदर कारवाईमध्ये जवळपास ६९ हजार ५६० रूपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे़ 

दुकानदारांसह ग्राहकांची फसवणूकनांदेड शहरात अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे हळद पावडर, कस्तुरी मेथी, धनिया पावडर आदी प्रकारच्या मसाले पदार्थांची पॅकिंग करून ती विक्री केली जात आहे़ दुकानदारांना जास्तीचे कमिशन अथवा एकावर एक फ्री अशाप्रकारच्या स्कीम देऊन माल द्यायचा आणि तो दुकानदारांमार्फत ग्राहकांच्या माथी मारायचा, असे अनेकांचे उद्योग सुरू असल्याचा संशय आहे़ दुकानदारांनी आपण विक्री करीत असलेला ब्रँड, मालाची कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी केले़ 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग