शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कोविड वार्डातील रुग्णाच्या नातेवाईकाचा डॉक्टरवर चाकू हल्ला; व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 17:46 IST

न्यायालयाने जामीन नाकारून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

ठळक मुद्देआरोपी गोंधळ ढळत घालत असल्याने त्यास डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शांत राहण्यास सांगीतले आरोपीवर यापूर्वी सुद्धा शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे

मुखेड ( जि.नांदेड ) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डातील एका रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि.२० ) सायंकाळी ५ च्या सुमारास घडला होता. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब मष्णाजी गायकवाड ( २५, रा.गणेश नगर, मुखेड ) यास अटक केली असून न्यायालयाने जामीन नाकारून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब मष्णाजी गायकवाड याचे नातेवाईक येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात उपचार घेत आहेत. मंगळवारी सायंकाळी भाऊसाहेब रुग्णाला भेटण्यासाठी आला होता. यावेळी तो इतर रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वाद घालून शिविगाळ करत होता. त्यावेळी वार्डातिल वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत राहण्यास सांगिलते. यामुळे संतापलेल्या भाऊसाहेब याने कर्तव्यावरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर धावून जात चाकूने हल्ला केला. प्रसंगावधान राखून उपस्थितांनी त्याला अडवले आणि पकडून ठेवले. यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर भाऊसाहेबने चाकूचा धाक दाखवून तेथून पळ काढला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, सहा.पो.नि.संतोष केंद्रे, पो.काॅ.गंगाधर चिंचोरे आदि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. काही वेळाने पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाकू  हस्तगत केला. विशेष म्हणजे आरोपी भाऊसाहेब याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील ब्रदर आदी विजय बनसोडे याने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब गायकवाड यांच्या विरोधात कलम ३५३,५०४,५०६ भादवी कलम ४,२५ भारतिय हत्यार कायदा अंतर्गत मुखेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब यास मुखेड न्यायालयात हजर केले. नायायाल्याने त्याचा जामिन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.संतोष केंद्रे हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड