शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

सेना गद्दारांचं श्राद्ध घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:54 IST

सध्या पितृपक्ष सुरु आहे़ त्यामुळे  अनेकांकडून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम सुरु असून शिवसेनाही गद्दारांचं जिवंतपणी श्राद्ध घालणार असल्याची घणाघाती टीका पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी चिखलीकरांचे नाव न घेता केली़

ठळक मुद्देभाजपकडून नगरसेवकांना २५ लाख देण्याचे आमिष दाखविले जात आहे़ त्यातून गद्दारांची फौज निर्माण करण्याचे काम होत आहे़ परंतु गद्दारांचे श्राद्ध कसे घालायचे हे शिवसेनेला चांगले माहीत आहे

नांदेड : सध्या पितृपक्ष सुरु आहे़ त्यामुळे  अनेकांकडून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम सुरु असून शिवसेनाही गद्दारांचं जिवंतपणी श्राद्ध घालणार असल्याची घणाघाती टीका पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी चिखलीकरांचे नाव न घेता केली़

 

मनपा निवडणुकीत चिखलवाडी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच उद्घाटन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी आले़ खोतकर म्हणाले, देशात सध्या वेगळ्या पद्धतीचा कारभार सुरु आहे़ आम्हीच या देशाचे तारणहार आहोत या आविर्भावात काही मंडळी वावरत आहेत़ ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे़ त्यांना बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखविली जात आहेत़ नोटाबंदी हे पैसा कमावण्याचे षड्यंत्र होते़ भाजपकडून नगरसेवकांना २५ लाख देण्याचे आमिष दाखविले जात आहे़ त्यातून गद्दारांची फौज निर्माण करण्याचे काम होत आहे़ परंतु गद्दारांचे श्राद्ध कसे घालायचे हे शिवसेनेला चांगले माहीत आहे, असेही खोतकर म्हणाले़ नांदेडातच आयुक्तालय झाले पाहिजे अशी सेनेची भूमिका असून कुणाशी युती करायची अन् कुणाशी आघाडी हा निर्णय नंतर घेऊ, परंतु त्यासाठी महापौर हा शिवसेनेचा राहील ही अट राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़  तत्पूर्वी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनीही चिखलीकरांवर सडकून टीका केली़ आ़ हेमंत पाटील म्हणाले, सध्या शहरात बॅनरबाजी सुरु आहे़ सेना प्रचारात मागे आहे, असा अपप्रचारही केला जात आहे़ त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही़ काही स्वयंघोषित नेते पक्ष बदलत असतील, परंतु त्यामुळे फारसा फरक पडत नाही़ सेनेला आयाराम-गयारामांची गरज नाही़ त्यांना तिकिटेही दिली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी निलंगेकरांवर टीका केली. नांदेडचे आयुक्तालय त्यांनीच रोखले़ त्यानंतर नांदेड-मुंबई गाडीला विरोध करुन ती बीदरला नेली़ आता मनपा निवडणुकीत कमळाबाई लक्ष्मीबाईच्या जिवावर उड्या मारत आहे़ एकीकडे काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे, असे ते म्हणाले.  ज्या तंबूत घुसतो, तो तंबूच घेऊन पळतोय्अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे यांनीही चिखलीकरांवर तोफ डागली़ ते म्हणाले, आर्थिक शाखेने मेहुण्यावर टाच आणली़ त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी चिखलीकरांनी भाजपपुढे लोटांगण घातले आहे़ मेहुण्याची काळजी त्यांना होणे स्वाभाविक आहे़ यापूर्वी अशोकराव, विलासराव यांच्याही तंबूत ते घुसले होते़ परंतु ज्या तंबूत ते घुसले, तो तंबूच घेऊन पळण्याची त्यांची परंपरा आहे़ तंबूत पळाले असले तरी, सेनेचा तंबू मात्र जागेवरच आहे़