शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नांदेड येथून शिवशाही केवळ हैदराबादला; प्रशासनाचा पुणे, मुंबईकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:13 IST

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासनाने नव्याने गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले़

नांदेड : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासनाने नव्याने गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले़ त्याचप्रमाणे एसटी प्रशासनानेदेखील पुणे, मुंबई मार्गाकडे कानाडोळा केला आहे़ हैदराबादकडे शिवशाही सोडण्यात काही अधिकार्‍यांचे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत असलेले हितसंबंध कारणीभूत असल्याची चर्चा महामंडळात होत आहे़ 

नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने रात्रीला धावणारी नांदेड-पुणे, पूर्णा-अंजनी (नागपूर) एक्स्प्रेस बंद करून खासगी ट्रॅव्हल्सच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा करून दिला़ रेल्वेच्या पावलावर पाऊल ठेवत एसटीच्या अधिकार्‍यांनी  नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, लातूर मार्गावर शिवशाही सोडण्याकडे दुर्लक्ष केले़ नांदेड विभागाला मिळालेल्या सहाला सहा शिवशाही बस प्रवासी नसलेल्या हैदराबाद मार्गावर सोडण्यात येत आहेत़ 

नांदेड येथून पुणे, नागपूर, मुंबईसाठी रात्रीच्या वेळेला स्वतंत्र रेल्वे नसल्याने या मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावतात़ रेल्वेसाठी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीसह अनेक संघटना, कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली़ परंतु, रेल्वे अधिकारी आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने मुंबई, पुण्यासाठी नांदेडातून रेल्वे सुरू केली जात नसल्याचा आरोप  खासदारांनी रेल्वे महाप्रबंधकांच्या बैठकीत केला होता़  

नांदेडातून हैदराबाद जाण्यासाठी अनेक रेल्वेसह विमानसेवादेखील उपलब्ध आहे़ शिवशाहीच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट अत्यल्प असल्याने आणि रेल्व प्रवास  सुरक्षित असल्याने बहुतांश प्रवासी रेल्वेनेच प्रवास करतात़ मागणी नसताना एसटी अधिकार्‍यांनी शिवशाही हैदराबादकडे वळविली़ त्यामुळे रेल्वे अधिकार्‍यांप्रमाणे एसटी अधिकार्‍यांचे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी अर्थपूर्ण संबंध तर नाहीत ना, असा प्रश्न इंटकचे विभागीय सचिव पी़आऱइंगळे यांनी उपस्थित केला आहे़ भाडेतत्त्वावर घेतलेल्या सहा शिवशाही गाड्या नांदेड विभागाला दिल्या़ २२ जानेवारी रोजी उद्घाटनानंतर मार्गस्थ झालेल्या गाड्यांना तेलंगणा चेक पोस्टवर अडविले. दरम्यान, काही तासानंतर एसटी अधिकार्‍यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून निजामाबाद आरटीओंकडून परवानगी घेतती़ परंतु, यात भरपूर वेळ गेल्याने सकाळच्या गाड्या बिलोली ते हैदराबाद रद्द करण्यात आल्या़ मात्र, सायंकाळी सोडण्यात येणार्‍या तीनही गाड्या हैदराबादपर्यंत धावल्या़

शिवशाही गाड्या येऊनही पुणे-मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांचे हाल सुरुच आहेत़ या मार्गावर मोजक्याच रेल्वे धावतात़ त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहत नाही़ खाजगी ट्रॅव्हल्ससोबत स्पर्धा करण्यासाठी पुणे-मुंबईसाठी शिवशाही सोडण्याची मागणी आहे.नांदेड येथून पुण्यासाठी सकाळी सहा वाजता केवळ एकच बस धावते़ त्या बसला चांगला प्रतिसाद आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणार्‍यांची संख्या अधिक आहे़ परंतु, हा विचार न करता हैदराबादसाठी शिवशाही सोडल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत़नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयाने शिवशाही बससेवेचे नांदेड - हैदराबाद तिकिट ४९५ रूपये निर्धारित केले आहे़ नांदेड ते हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेचे एसटी थ्री टायरचे तिकीटदेखील ४९५ रूपये आहे़ परंतु, स्लीपर कोचचे १९० रूपये तर पॅसेंजर गाडीने केवळ १३० रूपयांत हैदराबादला पोहोचतात़ एसटीचा प्रवास दगदगीचा असल्याने प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात.

टॅग्स :NandedनांदेडShivshahiशिवशाही