शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या चेल्याचपाट्यांनी सहकार क्षेत्राचे श्राद्ध घातले : सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 17:26 IST

Sadabhau Khot on Shrad Pawar : साखर कारखाने लाटण्यासाठी शरद पवारांच्या चेल्यांनी खोट्या खाजगी कंपन्या नोंदणीकृत केल्या.

ठळक मुद्देसर्व साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे होण्याची गरज आहे.दहा ते बारा कोटी रुपयांमध्ये त्यांनी हे साखर कारखाने खरेदी केले.

नांदेड : सहकार चळवळ उभारण्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपसात कारखाने वाटून घेतले. त्यात शरद पवारांच्या चेल्याचपाट्यांनी सहकार क्षेत्राचे श्राद्ध घातले असा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. 

शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त बुधवारी ते नांदेडात आले होते. ते म्हणाले, सहकार क्षेत्रातून सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी यांना मालक बनविण्याचा मुख्य उद्देश होता. त्या माध्यमातून राज्यात सहकारी साखर कारखाने उभारण्यात आले. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे कारखाने आपसात वाटून घेतले. राज्यात ५५ साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांचा घोळ २५ हजार कोटींचा आहे. जिल्हा सहकारी बँकाही घोटाळ्यांनी बरबटल्या आहेत. साखर कारखाने लाटण्यासाठी शरद पवारांच्या चेल्यांनी खोट्या खाजगी कंपन्या नोंदणीकृत केल्या. ज्यामध्ये कोणतीही उलाढाल नव्हती. दहा ते बारा कोटी रुपयांमध्ये त्यांनी हे साखर कारखाने खरेदी केले. हे सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे होण्याची गरज आहे. ( Sharad Pawar's activits pay homage to co-operative sector, Sadabhau Khot ) 

गेल्या हंगामात सोयाबीनच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ५० हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या. परंतु, त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. मागील हंगामात शेतकऱ्यांनी ५ हजार ८०० कोटी रुपयांचा विमा भरला. परंतु नुकसान भरपाई म्हणून फक्त ९०० कोटी रुपये देण्यात आले. पीक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करणारी शिवसेना आता सत्तेची फळे चाखण्यात मग्न आहे. राज्यात फक्त २० पीक कर्ज देण्यात आले आहे. असेही खोत म्हणाले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पांडव मंगनाळे, डॉ.दत्ता मोरे, जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, सचिन कदम यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSadabhau Khotसदाभाउ खोत Sugar factoryसाखर कारखानेNandedनांदेड