शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गो़रा़ म्हैसेकर यांचे निधन

By admin | Updated: September 24, 2016 03:39 IST

विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कडक शिस्तीचे डॉ़ गोविंद रामचंद्र तथा गो़ रा़ म्हैसेकर यांचे गुरुवारी रात्री निधन झाले़

नांदेड : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, स्वतंत्रता सेनानी, राज्यसभा सदस्य, कुलगुरू अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कडक शिस्तीचे डॉ़ गोविंद रामचंद्र तथा गो़ रा़ म्हैसेकर यांचे गुरुवारी रात्री निधन झाले़ ते ९४ वर्षांचे होते. शुक्रवारी दुपारी शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़गेल्या अनेक दिवसांपासून ते अंथरुणाला खिळून होते़ गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली़ मनपाचे माजी आयुक्त तथा नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ़ दीपक म्हैसेकर तसेच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ दिलीप म्हैसेकर यांचे ते वडील होत. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी म्हैसेकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठविले होते़ १९७६ ते १९८२ या काळात राज्यसभेचे सदस्य होते़राज्य नियोजन समितीेसह राज्य शिक्षण मूल्यमापन समिती, राज्य एनसीसी कमिटी, पंचायत राज्य मूल्यमापन समिती, ग्रामीण रोजगार हमी योजना, पागे समिती इत्यादी अनेक समित्यांबरोबरच मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे संस्थापक सदस्य होते़ बाबा आमटे यांचा आदर्श घेऊन त्यांनी नांदेड येथे नेरली कुष्ठधाम उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला़ शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी़लिट देऊन सन्मानित केले होते़ (प्रतिनिधी)>डॉ.म्हैसेकर हे थोर शिक्षक, प्रशासक आणि अत्यंत सहृदयी व्यक्ती होते. गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची दारे उघडी व्हावीत यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. - विद्यासागर राव, राज्यपालडॉ. म्हैसेकर यांच्या निधनाने शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे ध्येववादी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री