शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या संघर्षानंतर कीव्हमधून वैज्ञानिक मुनेश्वर भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 06:26 IST

अनुराग पाेवळे लोकमत न्यूज नेटवर्क  नांदेड : तब्बल १६ वर्षांपूर्वी भारत साेडून परदेशात स्थायिक झालेले राजेश मुनेश्वर हे शुक्रवारी ...

अनुराग पाेवळेलोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : तब्बल १६ वर्षांपूर्वी भारत साेडून परदेशात स्थायिक झालेले राजेश मुनेश्वर हे शुक्रवारी आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतले आहेत. वैज्ञानिक म्हणून काम करत असलेले त्यांचे स्पेस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर रशियाच्या बाॅम्ब हल्ल्यात नष्ट झाले आहे. घराजवळही अनेक मिसाईल हल्ले त्यांनी पाहिले. या युद्धभूमीतून जीवघेणी पायपीट करत ते राेमानियात पाेहाेचले. तेथून ते दिल्लीत आले आहेत.   नांदेड जिल्ह्यातील सिरंजणी (ता. हिमायतनगर) येथील मूळ रहिवासी असलेले राजेश मुनेश्वर यांनी आपले शिक्षण नागपूर येथे पूर्ण केले. त्यानंतर युक्रेनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. तेथेच ते स्थायिक झाले. काही दिवस रशियातील माॅस्काे येथे वास्तव्य केल्यानंतर ते युक्रेनमध्ये स्पेस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. इंडाे-युक्रेन या प्रकल्पांतर्गत ते कार्यरत हाेते. युद्ध सुरू झाल्यानंतर ते राहत असलेल्या कीव्ह शहरावर रशियाने हल्ले सुरू केले. या हल्ल्याचा अनुभव त्यांनी स्वत: घेतला. ते काम करत असलेल्या स्पेस सेंटरलाही रशियाने लक्ष्य केले. घराजवळही बाॅम्ब हल्ले झाले. या बाॅम्ब हल्ल्याचे अगदी बाल्कनीतून ते साक्षीदार हाेते. सरकारच्या सूचनेनंतर त्यांनी कुुटुंबीयांसह शहर साेडले. दाेन दिवस प्रवास करत ते  रेल्वे स्टेशनवर पाेहाेचले. तेथे स्थानिक विरुद्ध परदेशी असा भेदभाव केला जात हाेता. बाळाला घेऊन पत्नी रेखा मुनेश्वर यांच्यासह बर्फ पडत असताना त्यांनी जीवघेणी पायपीट केली. साेळा तासांचा बस प्रवास करून ते बाॅर्डर क्राॅस करून राेमानियात पाेहाेचले. राेमानियात उभारलेल्या आश्रयस्थळी थांबले. तेथून भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तेथे केंद्रीय मंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांनीही मदत केली.  

युद्धाला अमेरिका, नाटाे जबाबदारया युद्धाला नाटाे आणि अमेरिका जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी दिली. रशियाकडून युक्रेनला वारंवार इशारे दिले जात हाेते. मात्र, अमेरिका आणि नाटाे देशांच्या बळावर युक्रेनने त्याकडे दुर्लक्षच केले. हे युद्ध आणखी दाेन महिने तरी सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

nआपण इस्रोसाेबत काम करण्यास तयार असून, याबाबत इस्रोशी संपर्क केला आहे. डीआरडीओ साेबतही काम करण्यास आपण तयार आहाेत, असे मुनेश्वर म्हणाले.