शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:25 IST

अवघ्या पाच व्हेंटीलेटरवरच रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास दिला जातो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना अम्बूबॅगवरच अवलंबून रहावे लागते़ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण खात्याला कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़

ठळक मुद्देअम्बूबॅगवरच भिस्त : कृत्रिम श्वाच्छोश्वासासाठी करावी लागतेय कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवत आहे़ अवघ्या पाच व्हेंटीलेटरवरच रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास दिला जातो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना अम्बूबॅगवरच अवलंबून रहावे लागते़ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण खात्याला कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़शासकीय रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ व शेजारील तेलंगणातून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण येतात़ रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागावरही मोठा ताण असतो़ परंतु, त्या तुलनेत रुग्णालयात कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही़ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्याही मोजकीच आहे़ त्यामुळे कार्यरत कर्मचारी आणि डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडतो़ अपघात व इतर आजारांच्या अत्यवस्थ रुग्णांचीही संख्या मोठी असते़ या रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास देणे गरजेचे असते़ परंतु, गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात व्हेंटीलेटरची संख्या मोजकीच आहे़ पाचच व्हेंटीलेटरवर कृत्रिम श्वाच्छोश्वास देण्यात येतो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना ऐनवेळी गरजेनुसार एका रुग्णाचे व्हेंटीलेटर काढून दुसºया रुग्णाला लावण्याची कसरत करावी लागते़ ही कसरत जोखमीचीही ठरु शकते़ त्यामुळे इतरवेळी अत्यवस्थ रुग्णांना अम्बूबॅगद्वारेच श्वाच्छोश्वास दिला जातो़ही अम्बूबॅग नातेवाईकांच्या हाती असते़ ठरावीक वेळेला त्या अम्बूबॅगला दाब देणे गरजेचे असते़ त्यामुळे यामध्ये नातेवाईकांकडून हलगर्जी झाल्यास रुग्णांच्या जिवावरही बेतू शकते़ व्हेंटीलेटरच्या तुटवड्याबाबत प्रशासनाने यापूर्वी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे़ परंतु ,अद्यापही वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्याचा पुरवठा करण्यात आला नाही़ सिद्धीविनायक ट्रस्टकडून व्हेंटीलेटरचा पुरवठा करण्यात येणार होता़ मात्र सध्या तो विषयही प्रलंबितच आहे़ त्यामुळे गंभीर विषयाकडे आता लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे़---व्हेंटीलेटरच्या तुटवड्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याशी चर्चा झाली आहे़ वरिष्ठ कार्यालय किंवा सिद्धीविनायक ट्रस्टकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे़ व्हेंटीलेटरसाठी प्रयत्न करीत असल्याचे अधिष्ठाता म्हणाले़

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलNanded civil hospitalजिल्हा रुग्णालय नांदेड