शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमधील दलित वस्तीतील कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:33 IST

दलित वस्तीअंतर्गत शहरातील दोन कोटींच्या कामांना बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सव्वाकोटी रुपयांच्या मोफत पिशवी वाटप करण्याच्या उपक्रमाच्या तीन निविदाही मंजूर करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देस्थायी समितीची बैठक : श्रावस्तीनगर, जयभीमनगरमध्ये दोन कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दलित वस्तीअंतर्गत शहरातील दोन कोटींच्या कामांना बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सव्वाकोटी रुपयांच्या मोफत पिशवी वाटप करण्याच्या उपक्रमाच्या तीन निविदाही मंजूर करण्यात आल्या आहेत.स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, समिती सदस्य अब्दुल सत्तार, किशोर स्वामी, मसूद खान, उमेश पवळे, भानुसिंह रावत आदींची उपस्थिती होती. स्थायी समितीपुढे एकूण १२ विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ७ मध्ये जयभीमनगर भागात नरसिंह विद्यामंदिरच्या जागेतून नाला बांधकामाच्या कामास मंजुरी देण्यात आली. सदर कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील अंदाजपत्रकीय दराची ६६ लाख ६७ हजार रुपयांची स्वास्तिक कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली. त्याचवेळी श्रावस्तीनगर भागातही दलित वस्ती निधीतून ड्रेनेज लाईन टाकून नाल्याचे बांधकाम करण्यासाठी ९८ लाख रुपये प्राप्त झाले होते.या कामासाठीही अंदाजपत्रकीय दराची स्वान कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली. श्रावस्तीनगरमध्येच रस्ता कामासाठी ३१ लाख ३८ हजार ६०० रुपये दलित वस्ती निधीतून मिळाले आहेत. या कामासाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा ०.९९ दर प्राप्त झाला आहे. हे काम स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला देण्यात आले.पालकमंत्री रामदास कदम यांच्या संकल्पनेतून शहरात प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी सव्वाकोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आला आहे. या मोफत पिशवी वाटपाच्याही तीन वेगवेगळ्या निविदा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिशव्यांसाठी कपड्याचा पुरवठा करणे, कापडी पिशव्या शिवून देणे आणि त्या कापडी पिशव्यावर स्क्रिन प्रिंटिंग करणे अशा तीन निविदा आहेत. त्या निविदांनाही मंजुरी दिली आहे. या तिन्ही कामासाठी एक कोटी रुपये खर्च होणार असून २५ लाख वेगळ्याने बॅनरसाठी खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या विविध विभागातंर्गत सुरक्षा कक्ष नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदांनाही मंजुरी देण्यात आली आहे.प्रभारी उपअभियंता मनोहर दंडे यांचा पुनर्विलोकन अर्जही स्थायी समितीने मंजूर केला आहे. याच सभेत शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग खरेदी करण्याच्या निविदेसह मंजुरी देण्यात आली.बैठकीस अ. लतिफ लोखंडवाला, शेर अली, सतीश देशमुख, प्रशांत तिडके, मोहिनी येवनकर, कांताबाई मुथा, ज्योत्स्ना गोडबोले, वैशाली देशमुख, उपायुक्त माधवी मारकड, संतोष कंदेवाड, नगरससचिव अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता गिरीष कदम, विलास भोसीकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद