शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडहून १ जूनपासून सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:47 IST

नांदेड विभागात सहा स्थानकांवर आरक्षण 

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचा १ जूनपासून देशामध्ये २०० रेल्वे चालविण्याचा निर्णय

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सहा रेल्वेस्थानकांवर शुक्रवारपासून आरक्षण तिकीट देण्यास सुरुवात केली आहे़ १ जूनपासून नांदेड येथून सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे़ 

रेल्वे बोर्डाच्या सूचनेनूसार २२ मेपासून नांदेड  विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद या सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आरक्षण कार्यालयाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत़ आरक्षण तिकिट सकाळी ८ ते १२ या वेळेत आणि दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळणार आहे़ 

रेल्वे बोर्डाने १ जूनपासून देशामध्ये २०० रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे़ यामध्ये विशेष गाड्यांचाच समावेश आहे़ त्यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. ही गाडी १ जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच ३ जून पासून अमृतसर येथून ही गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल.  या गाडीस २२ डब्बे असतील, यात वातानुकुलीत तसेच बिगर वातानुकुलीत डब्बे असतील. सामान्य म्हणजेच जनरलचे डब्बे नसतील. या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस सारख्याच असतील. महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा, निर्देशानूसार दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान  प्रवाशांना या विशेष गाडीत प्रवास करता येणार नाही. 

लक्षणे नसतील तरच प्रवासविशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोना ( कोविड-१९) ची कोणतीही लक्षणे नसतील त्यांनाच या रेल्वेत प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवाशांना आवाहन रेल्वे आरक्षण केंद्र व रेल्वेस्थानकावर येताना, तसेच प्रवास करताना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे प्रवाशांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेNandedनांदेडPunjabपंजाब