शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सचखंड २७ तास उशिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:33 IST

उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्स्प्रेस मागील काही दिवसांत अनेकवेळा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावली़ शनिवारी नांदेडात पोहोचणारी अमृतसर-नांदेड (१२७१६) सचखंड एक्स्प्रेस तब्बल २७ तास उशिराने धावत असून रविवारी रात्री उशिरापर्यंत गाडी नांदेडात पोहोचली नव्हती़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्स्प्रेस मागील काही दिवसांत अनेकवेळा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावली़ शनिवारी नांदेडात पोहोचणारी अमृतसर-नांदेड (१२७१६) सचखंड एक्स्प्रेस तब्बल २७ तास उशिराने धावत असून रविवारी रात्री उशिरापर्यंत गाडी नांदेडात पोहोचली नव्हती़उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे़ त्यामुळे निर्माण झालेल्या धुक्याचा परिणाम गाड्यांवर होत असून उत्तर भारतातून धावणाºया सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत़ दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून उत्तर भारतात धावणारी श्रीगंगानगर एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद मार्गे आणि अकोलामार्गे या तीनही गाड्या उशिराने धावत आहेत़ त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे़ शनिवारी सचखंड एक्स्प्रेस रद्द झाल्याने रविवारी नांदेडहून अमृतसरसाठी रवाना झालेल्या सचखंड एक्स्प्रेसला मोठी गर्दी झाली होती़ ज्या प्रवाशांना गाडीमध्ये जागा मिळाली नाही़ त्यांनी मिळेल त्या गाडीने पुणे, औरंगाबाद आणि मनमाडपर्यंत प्रवास करणे पसंत केले़ परंतु, गाडी रद्द झाल्याने आणि उशिराने धावत असल्याने हजारो प्रवाशांच्या टूरच्या नियोजनावर पाणी फेरले आहे़ श्री सचखंड गुरूद्वारा दर्शनासाठी दिल्ली, पंजाब, अमृतसर या भागातून येणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे़ नववर्षानिमित्त दर्शनासाठी लाखो भाविक नांदेडात दाखल झाले़ भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे़ परंतु, ऐनवेळी गाड्या रद्द व काही गाड्या उशिराने धावत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़श्रीगंगानगर एक्स्प्रेस उशिराने सुटणारनांदेड येथून श्रीगंगानगरसाठी जाणारी श्रीगंगानगर एक्स्प्रेस रविवारी उशिराने सुटली़ त्यानंतर सोमवारी सुटणारी गाडीसंख्या १२४८६ नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेस ८ जानेवारी रोजी निर्धारित वेळेपेक्षा ११ तास उशिराने म्हणजेच रात्री १० वाजता सुटणार आहे़