शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST

वीज बिल वेळेवर मिळेना नांदेड : शहरातील विविध प्रभागांमध्ये महावितरणच्या वतीने वीज बिलाचे वेळेवर वाटप होत नाही. त्यामुळे नागरिकांना ...

वीज बिल वेळेवर मिळेना

नांदेड : शहरातील विविध प्रभागांमध्ये महावितरणच्या वतीने वीज बिलाचे वेळेवर वाटप होत नाही. त्यामुळे नागरिकांना अतिरिक्त शुल्क भरून बिल अदा करावे लागत आहे. महावितरणने वेळेत वीज बिल द्यावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

विजेच्या धक्क्याने मृत्यू

अर्धापूर : अर्धापूर येथील पुरभाजी कपाटे (वय ३८) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. घरातील वीज गेल्याने विद्युत खांबावर चढून वायर जोडत असताना वीज वाहक तारांशी स्पर्श होऊन ते खांबावरून खाली पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. अर्धापूर पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

आसना पुलाची पाहणी

अर्धापूर : नांदेड ते अर्धापूर रस्त्यावरील आसना नदीवरील पुलाची दुरुस्ती व रुंदीकरण कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी केली. यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, शाखा अभियंता सुदेश देशमुख, उपअभियंता गोविंद शिंदे, वैभव थोरवे आदींची उपस्थिती होती.

मरवाळीत गुन्हा दाखल

नायगाव : मोटारसायकलला कट मारला, याचा जाब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १३ जून रोजी रात्री मरवाळी येथे घडली. याप्रकरणी संभाजी मेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण पिंपळे, प्रशांत पवळे, राजू पवळे, हनुमंत पवळे, अशी आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक रामराव पडवळ यांनी मरवाळी येथे भेट देऊन माहिती घेतली.

आशा कर्मचारी व गट प्रवर्तक संपावर

हदगाव : तामसा पीएचसीअंतर्गत असलेल्या १७ आशा कर्मचारी व गट प्रवर्तक मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याबाबतचे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोदलवाड यांना देण्यात आले. यावेळी गट प्रवर्तक मीनाक्षी बांगर, कविता शक्करगे, साधना कांबळे, रमा जाधव, गया जोंधळे आदींची उपस्थिती होती.

अशोकरावांचे नरसीत स्वागत

नरसी फाटा : लोहगाव येथील आरोग्य केंद्र इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण नरसीमार्गे जात होते. नरसी येथील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मजूर फेडरेशनचे सदस्य डॉ. मधुकर राठोड, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष सय्यद इसाक, नजीरसेठ बागवान, शेख नजीर, शेख जब्बार, नंदकिशोर नरसीकर, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.

स्टुडंट फेडरेशनचे आंदोलन

वाईबाजार : विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा, शिष्यवृत्ती खात्यावर जमा करा या व इतर मागण्यांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने माहूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल काऊटकर, तालुकाध्यक्ष विशाल नरवाडे, सूरज कांबळे, चंद्रकांत पाटील, तुषार कांबळे, महेश कांबळे, काश्यप कांबळे, अजय पाझारे, समाधान मांजळकर यांची उपस्थिती होती.

अन्नपूर्णा किटचे वाटप

किनवट : आदिवासी समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने समाजातील गरजूंना अन्नपूर्णा किटचे वाटप करण्यात आले. पिंपळगाव, तलाईगुडा, भीलगाव, पळशी, लालूनाईक तांडा, मांडवी, गणेशपूर, नागापूर, दरसांगवी, लिंगी, उनकेश्वर, बोथ, उमरी बाजार, निराळा आदी गावांना भेटी देत अन्नपूर्णा किट देण्यात आली.

बीटस्तरीय शाळा बैठक

आरळी : कुंडलवाडी बीटअंतर्गत कुंडलवाडी, दुगाव, हुनगुंदा या तीन केंद्रांतील प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांची शाळापूर्व नियोजन बैठक शिक्षण विस्तार अधिकारी यादवराव कऊटकर व विशेषज्ञ गुणवंत हलगरे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जून रोजी घेण्यात आली. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक तोगरवार, निरडवाड, रामपुरे, चिवटे, राठोड, कल्याणकर आदींची उपस्थिती होती.

८० लाखांचा निधी मंजूर

हदगाव : तालुक्यातील चोरंबा बु. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी ८० लाखांचा निधी मंजूर झाला. चोरंबा उपकेंद्रात कुसळवाडी, चोरंबा खु., चोरंबा बु., तरोडा आदी गावांचा समावेश आहे. जि.प. सदस्य साहेबराव सावतकर यांनी निधीसाठी पाठपुरावा केला होता.

उमरी शाखेस भेट

उमरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांनी १४ जून रोजी उमरी येथील शाखेस भेट देऊन विविध संदर्भात माहिती घेतली. यावेळी शाखा व्यवस्थापक नादर, रमेश आनेमवाड, गंगाधर चिंताके, गोविंद बक्केवाड, नागदरवाड आदी उपस्थित होते.

कोविड लसीकरण

धर्माबाद : बाळापूर येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १२२ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यावेळी भाजपाचे चैतन्य घाटे, हिंदू युवा संघटनेचे सतीश मोटकुल यांनी लसीकरणाबाबत जनजागृती केली. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, मनीषा महामुनी, कल्याणी सूर्यवंशी, गायकवाड, वाघमारे, सोनवणे, लक्ष्मण निलेवाड, मारुती आरबाड आदींची उपस्थिती होती.

विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

उमरी : तालुक्यातील बोळसा बु. येथे वीज प्रवाह तारेचा स्पर्श होऊन बैल जागीच ठार झाल्याची घटना १४ जून रोजी घडली. संभाजी शिंदे या शेतकऱ्याच्या मालकीचा बैल होता. यामुळे त्यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

सिंदगी परिसरात पेरणीला सुरुवात

किनवट : किनवट तालुक्यातील सिंदगी मो. येथे एक दिवसाआड पाणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात केली. गतवर्षीप्रमाणे यावर्षी दुबार पेरणीचे संकट राहणार नाही, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नाल्या सफाईचे काम सुरू

फुलवळ : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नाल्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. याकामी सरपंच, उपसरपंच, सदस्य लक्ष ठेवून आहेत. नाल्यांची साफसफाई होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रार्थनास्थळे सुरू करा

किनवट : जिल्हा प्रशासनाने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करून पूजाअर्चा करण्यास व दर्शनासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी केली. प्रशासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्यास परवानगी दिली. मात्र, धार्मिक प्रार्थनास्थळांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी असल्याचे केंद्रे यांनी नमूद केले.