शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

भोकर पालिकेतील नोकर भरतीत नियमांची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:01 AM

उमेदवारांनी अर्जावर डकवलेल्या फोटोवर राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक होते. तसे जाहिरातीत नमूद होते. तरी एकाही उमेदवाराने स्वाक्षरी का घेतली नाही? हा सुद्धा तपासाचा भाग आहे. विशेष म्हणजे, भरती केलेल्या काही उमेदवारांचे पालक, नातेवाईक भोकर पालिकेतच कर्मचारी आहेत. त्या कर्मचाºयांची भरती प्रक्रियेतील काही दस्तावेजावर सह्या आहेत.

ठळक मुद्देघंटानाद आंदोलनाने ३ अटकेत

राजेश वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : उमेदवारांनी अर्जावर डकवलेल्या फोटोवर राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक होते. तसे जाहिरातीत नमूद होते. तरी एकाही उमेदवाराने स्वाक्षरी का घेतली नाही? हा सुद्धा तपासाचा भाग आहे. विशेष म्हणजे, भरती केलेल्या काही उमेदवारांचे पालक, नातेवाईक भोकर पालिकेतच कर्मचारी आहेत. त्या कर्मचाºयांची भरती प्रक्रियेतील काही दस्तावेजावर सह्या आहेत.असा झाला उलगडा...भोकर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (प्रभाग क्र.१३) नगरसेविका अरुणा विनायकराव देशमुख यांना पालिकेतील नोकरभरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी भरती प्रक्रियेच्या चौकशीची लेखी तक्रार केली होती. कुठेही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे अखेर त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून भरती प्रक्रियेचे दस्तावेज प्राप्त केले. यात त्यांना नोकर भरतीतील अनियमितता, विसंगती, गैरव्यवहार, बनावट दस्तावेजाची खात्री झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान, घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. यापूर्वीच्या अटकेतील तिघांना जामीन मिळाला आहे.आरोपींची कोर्टबाजीप्रकरणातील १३ जणांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी याचिका दाखल केली होती़ परंतु, ती फेटाळण्यात आली. त्यानंतर दीड महिन्यांपूर्वी यातील तत्कालीन अध्यक्ष विनोद चिंचाळकर यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन मिळण्यासाठी केलेली याचिका फेटाळण्यात आल्याने जामीन मिळाला नाही. तर यातील आरोपी तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ व शारीरिक शिक्षकाने कुठेही जामीन मागीतला नाही हे विशेष. तरीही अद्याप या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.१५ जणांचा सहभागभोकर न्यायालयाने प्रकरणातील तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, तत्कालीन नगर अभियंता (विद्युत) गजानन सावरगाकर, तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता श्रीहरी चोंडेकर, तत्कालीन लेखापाल रामसिंग लोध, शारीरिक शिक्षक (नाव नाही) यासह फायरमन पदावर भरती करण्यात आलेल्या त्रिरत्न सुरेश कावळे, रमाकांत पंढरीनाथ मरकंठे, संदीप मारोतीराव श्रीरामवार, नागेश व्यंकटराव चाटलावार आणि शिपाई पदावर भरती करण्यात आलेल्या दिलीप नारायण देवतळे, संजय बंन्सी पवार, महेश सुरेशराव दरबस्तवार, नारायण रामा आदेवाड आदी १५ जणांवर न्यायालयाच्या आदेशाने प्रकरणातील आरोपींनी संगनमत करुन पूर्वनियोजित कट रचून पदाचा दुरुपयोग करीत बनावट दस्तावेज तयार करुन जनतेची व शासनाची फसवणूक केल्याबाबत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपास पो.उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी करीत आहेत.घंटानाद आंदोलनानंतरतिघे अटकेततक्रारदार नगरसेविकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांसह महात्मा गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन पुकारल्यानंतर १५ आरोपींपैकी चतुर्थश्रेणीत नोकरीला लागलेले त्रिरत्न कावळे, महेश दरबस्तवार, दिलीप देवतुळे या तिघांना भोकर पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केली. न्यायालयाने सर्वांना ५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीArrestअटकCrime Newsगुन्हेगारी