लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : आदिलाबादहून तिरुपतीकडे जाणाºया कृष्णा एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये नांदेड येथील सराफा व्यापाºयाच्या मुनीमाचे अज्ञात चोरट्यांनी ३० लाख रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली असून रेल्वे पोलिसात मात्र सोमवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही़रविवार ३ डिसेंबरच्या मध्यरात्री कृष्णा एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली़ नांदेड येथील सराफा व्यापाºयाचा मुनीम या गाडीमधून हैैदराबाद येथे जात होते़उमरी स्टेशनच्या दरम्यान प्रसाधन गृहाकडे जात असताना चोरट्यांनी या मुनीमास धाक दाखवून जबरीने त्यांच्याकडील रोकड हिसकावून घेतली़ ही रोकड ३० लाखापेक्षाही अधिक असल्याचे सांगण्यात येते़ मात्र रेल्वे पोलिसांनी तक्रारदार व चोरी गेलेली रक्कम सांगण्यास नकार दिला़ सोमवारी दिवसभर व सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस तपास सुरूच होता़ दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेची लुट होताना कसलीच आरडाओरड व झटापट झाली नाही़ अथवा उमरी स्थानकावर ड्युटीवर असलेले पोलिस व गाडीमध्ये सुरक्षेसाठी असणाºया आरपीएफ यांनाही याची कसलीच माहिती मिळाली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली़वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या प्रकरणाचा तपास होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले़रोकड लुटीचे प्रकरण संशयास्पद४दरम्यान, या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्याश्ी संपर्क साधला असता सदरील रोकड लुटीचे प्रकरण संशयास्पद व संदिग्ध असल्याचे सांगितले़ या प्रकरणी आपण डीवायएसपी यांच्याशी परभणी येथे भेटून कसून तपास करीत असल्याची माहिती दिली़
३० लाख रुपये पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:00 IST
उमरी : आदिलाबादहून तिरुपतीकडे जाणाºया कृष्णा एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये नांदेड येथील सराफा व्यापाºयाच्या मुनीमाचे अज्ञात चोरट्यांनी ३० लाख रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली असून रेल्वे पोलिसात मात्र सोमवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही़
३० लाख रुपये पळविले
ठळक मुद्देमुनीमास चोरट्यांनी लुटले : कृष्णा एक्सप्रेसमधील घटना