शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या भाग्यनगरमध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:40 IST

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली.

नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज व रोख चोरट्यांनी लंपास केला आहे. 

भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅनॉल रस्त्यावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यातच मंगळवारी पहाटे जय रेसिडेन्सी मध्ये श्री माचेवाड हे 303 नंबरच्या फ्लॅट मध्ये राहतात. माचेवाड हे सोमवारी आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी औरंगाबाद येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केले. लोखंडी टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. कपाटाचे दार तोडून त्यामध्ये असलेले दागिने आणि 40 ते 45 हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे श्री माचेवाड यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डमाले यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानं मुख्य रस्त्यापर्यंत माग काढत गेले नंतर जागेवरच फिरू लागल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ गेले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना ताजी असताना एका टिप्परची बॅटरी तसेच दुचाकीमधील पेट्रोल चोरट्यांनी लंपास केले. अशा घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाNandedनांदेड