शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

दिरंगाईमुळे रुतली सायकलची चाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:50 IST

अतिमागास तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणा-या व शाळेपासून ५ कि़ मी़ अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना मानव विकास मिशनच्या वतीने राबविण्यात येते़ जिल्ह्यातील १ हजार १९४ मुलींची या योजनेसाठी निवड झाली़ सायकल वाटपासाठी ३५ लाख ८२ हजार रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला़ मात्र जि़ प़ शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सायकल वाटप केलेच नाही़ त्यामुळे गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़

भारत दाढेल ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अतिमागास तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणा-या व शाळेपासून ५ कि़ मी़ अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना मानव विकास मिशनच्या वतीने राबविण्यात येते़ जिल्ह्यातील १ हजार १९४ मुलींची या योजनेसाठी निवड झाली़ सायकल वाटपासाठी ३५ लाख ८२ हजार रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला़ मात्र जि़ प़ शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सायकल वाटप केलेच नाही़ त्यामुळे गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़मानव विकासच्या वतीने मुलींच्या शिक्षणासाठी सायकल वाटपाची योजना राबविली जाते़ सायकल खरेदी न करता त्याची रक्कम लाभार्थी मुलीच्या खात्यात थेट जमा करण्यात येते़ त्यासाठी सायकल खरेदीपूर्वी २ हजार रूपयांची रक्कम मुलींच्या बँक खात्यात टाकली जाते़ सायकल खरेदी केल्याची पावती शालेय व्यवस्थापन समितीकडे सादर केल्यानंतर उर्वरित १ हजार रूपयांचा निधी पुन्हा संबंधित मुलीच्या खात्यात जमा होतो़ या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत होते़ राज्यात २०१३ ते २०१७ या कालावधीत १ लाख १० हजार १४३ मुलींनी या योजनेचा लाभ घेतला आहे़ असे असले तरी नांदेड जिल्ह्यात मात्र चालू शैक्षणिक वर्षात मुलींना सायकल खरेदीसाठी निधी मिळाला नाही़ जिल्हा नियोजन विभागाने मानव विकास योजनेतंर्गत ३५ लाख ८२ हजार रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला़मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही तत्परता दाखविली नाही़ मागील पाच, सहा महिन्यांपासून या सायकल वाटपाची प्रक्रिया पूर्ण होवू शकली नाही़ निधी उपलब्ध असतानाही मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध होत नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ यासंदर्भात जि़ प़ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे़ सायकल मंजूर झालेल्या शाळा व विद्यार्थिनींची संख्या पुढीलप्रमाणे- लोहा तालुक्यात १० शाळांतील ११२ मुली, देगलूर - १४ शाळांतील २४२ मुली, बिलोली - ११ शाळा- १३५ मुली, धर्माबाद - १० शाळा- १८७ मुली, उमरी- ८ शाळा, १४५ मुली, मुदखेड - १ शाळा- १३ मुली, भोकर- ११ शाळा-१९३ मुली, हिमायतनगर - ३ शाळा- ३४ मुली, किनवट- ११ शाळा- १३१ मुली़ मंजूर झालेला निधी - लोहा- ३ लाख ३६ हजार, देगलूर- ७ लाख २६ हजार, बिलोली- ४ लाख ५ हजार, धर्माबाद -५ लाख ६१ हजार, उमरी -४ लाख ३५ हजार, मुदखेड-३९ हजार, भोकर -५ लाख ८५, हिमायतनगर -१ लाख २ हजार, किनवट- ३ लाख ९३ हजाऱप्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही-धनगेजिल्हा परिषदेतील शिक्षण विभागच नव्हे,तर इतर विभागातही प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे गत १० महिन्यांपासून कोणत्याच योजना मार्गी लागल्या नाहीत़ त्यांच्या अनुपस्थितीत अधिकारी काम करण्यास तयार नसतात़ काही विभागात अधिकाºयांच्या जागा रिक्त आहेत़ तर काही ठिकाणी प्रभारी कार्यभार आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत़ शिक्षण विभागात गेल्या अनेक दिवसांपासून सावळागोंधळ सुरू आहे़ कोणाचा पायपोस कुणाला नाही़ त्यामुळे गोरगरीब घरातल्या मुली ज्या शिक्षणासाठी धडपड करत आहेत, अशांनाच सुविधा मिळत नसतील तर योजना नावालाच उरतील़ - रावसाहेब धनगे, जि़ प़ सदस्य़शाळेच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ८ वी ते १० वीच्या मुली तसेच उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ११ वी ते १२ वी च्या लाभार्थी मुलींचे नाव निश्चित केले जाते़ यात गाव व शाळेपासून असलेले गावाचे अंतर याची तपशीलवार माहिती घेतली जाते़ शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थिनीची यादी अंतिम केल्यानंतर तिचे बँकेत खाते उघडले जाते़ आरटीजीएसद्वारे खरेदीचा निधी थेट तिच्या खात्यात जमा केले जातो़