शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोदावरी मानार’ चे होणार फेरमूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:30 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँक : कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानारच्या विक्री प्रक्रियेला प्रतिसाद मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.जिल्ह्यातील पाच मोठ्या कारखान्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कोट्यवधींचे कर्ज आहे. या कारखान्यांकडील वसुलीचे प्रयत्न जिल्हा बँकेकडून सुरु आहेत. त्यात ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार कारखान्याची तीन वेळा विक्री प्रक्रिया केली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. गोदावरी मानारचे जिल्हा बँकेने यापूर्वी ५२ कोटींचे मूल्यांकन केले होते. आता चौथ्यांदा विक्री प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी जिल्हा बँकेकडून गोदावरी मानारचे फेरमूल्यांकन केले जाणार आहे. गोदावरी मानारकडे जिल्हा बँकेचे मूळ ५४ कोटींचे कर्ज आहे तर बाजूला ठेवलेल्या व्याजासह ही रक्कम १०१ कोटी रुपये इतकी आहे.दरम्यान, जिल्हा बँकेचे ४७ कोटी रुपये कर्ज असलेल्या कलंबर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचीही प्रक्रिया पाच वेळा करण्यात आली.पाचव्यांदा औरंगाबादच्या प्रणव आॅटोने हा कारखाना खरेदी करण्यासाठी तयारी दर्शविली. यासाठी २ कोटी रुपये सुरक्षा ठेव अनामत (इएमडी) भरली आहे.मात्र सदर विक्री प्रक्रियेला साखर आयुक्तांनी परवानगी दिली नाही. तसेच मंत्रीगट समितीनेही कलंबरच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या सर्व प्रकारात जिल्हा बँकेने आता न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची आवश्यक ती तयारी केली जात आहे.अन्य तीन कारखान्यांकडेही कोटींच्या आकड्यात रक्कम थकीत आहे. मात्र या कर्ज प्रकरणासाठीचे कोणतेही गहाण खत बँकेकडे उपलब्ध नसल्याची खळबळजनक बाबही आता पुढे आली आहे.हुतात्मा जयवंत पाटील सहकारी कारखान्याकडे ५४ कोटी, जय अंबिका सहकारी साखर कारखान्याकडे ५२ कोटी आणि जय शिवशंकर कारखान्याकडे साडेतीन कोटी रुपये थकीत आहेत. या कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून प्रयत्न सुरु आहेत.त्यात हु. जयवंत पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसंदर्भात जिल्हा बँकेने तत्कालीन संचालकांकडून ही कर्ज वसुली करण्यासंदर्भात न्यायालयातून आदेश मिळविले आहेत. जय शिवशंकर कारखान्याकडून साडेसात कोटींची वसुली जिल्हा बँकेने केली आहे. उर्वरित साडेतीन कोटी रुपयांच्या वसुलीसाठीही प्रयत्न सुरु आहेत.नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आली नफ्यातजिल्हा बँकेवर रिझर्व बँकेने घातलेले निर्बंध २०१३ मध्ये उठविल्यानंतर २०१५ मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले. मागील तीन वर्षांत जिल्हा बँक पहिल्यांदाच मोठ्या नफ्यात आली आहे. बँकेचा आजघडीचा निव्वळ नफा पाच कोटीवर आला आहे. मार्च २०१८ अखेर जिल्हा बँकेने ८ कोटी ५३ लाखांचा नफा मिळविला होता. आयकर वगळता निव्वळ नफा पाच कोटींचा आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे नांदेड जिल्हा बँकेने नांदेड सहकारी सूत गिरणीकडील ९ कोटी ६८ लाखांची मोठी वसुली केली. नांदेड सहकारी सूत गिरणीवर मूळ कर्ज ३ कोटी ८४ लाखांचे होते. व्याजासह जिल्हा बँकेने वसुली केली. परिणामी बँकेचा नफा वाढत गेला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे, संचालक मंडळांच्या उपाययोजना उपयुक्त ठरल्याचे कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न पुढच्या सभेतजिल्हा बँकेची मासिक सभा गुरुवारी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत एकूण २३ विषय चर्चेला होते. त्यामध्ये कर्मचाºयांच्या वेतनवाढीचा विषय होता. कर्मचाºयांच्या वेतनवाढीसंदर्भात पुढील सभेत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. आ. प्रताप पाटील चिखलीकरांसह इतर संचालकांनी कर्मचाºयांना वेतनवाढ देणे आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीस १२ संचालक उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgodavariगोदावरीbankबँक