शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:51 IST

नांदेड उत्तर मतदारसंघातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी आ. डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सरपंचासह विविध गावच्या ग्रामस्थांनी अनेक सरकारी योजनांचा निधी गावात पोहचत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. आज उपस्थित झालेल्या प्रश्नासंदर्भात पुन्हा आढावा घेणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

ठळक मुद्देडी. पी. सावंत यांनी दिले प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी आ. डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सरपंचासह विविध गावच्या ग्रामस्थांनी अनेक सरकारी योजनांचा निधी गावात पोहचत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. आज उपस्थित झालेल्या प्रश्नासंदर्भात पुन्हा आढावा घेणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.समन्वय समितीच्या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, पं. स. सभापती सुखदेव जाधव, जि.प. सदस्य साहेबराव धनगे, डॉ. दिनेश निखाते, जि. प. सदस्य मनोहर शिंदे, गंगाप्रसाद काकडे यांच्यासह तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार पोटे, बीडीओ सरोदे, तालुका कृषी अधिकारी सरदेशपांडे उपस्थित होते.या बैठकीत आ. सावंत यांनी सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांकडून गावनिहाय अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तब्बल ८० टक्के ग्रामस्थांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर देण्याची मागणी केली. याबरोबरच विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्याबाबतही आग्रह धरला. दरम्यान, मागील वर्षी केलेल्या अधिग्रहणाचे पैसे अद्यापही मिळालेले नाही. याबरोबरच बोंडअळीची नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. कृषी विभागातील कर्मचाºयांच्या रिक्त जागांचा मुद्दाही उपस्थित झाला. यावर आ. सावंत यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी अधिकाºयांना सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडD.P. Sawantडी. पी. सावंत