शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

नांदेड पोलीस भरती प्रकरणी १६ मे ला फेरपरीक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 18:56 IST

रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेड पोलीस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या भरतीसाठी नव्याने १६ मे ला फेरपरीक्षा होणार असल्याचे प्रशासनाने आज जाहीर केले.

नांदेड : रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेड पोलीस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या भरतीसाठी नव्याने १६ मे ला फेरपरीक्षा होणार असल्याचे प्रशासनाने आज जाहीर केले. यासोबतच परीक्षा घोटाळ्यातील मुख्यधागा असलेली एसएसजी सॉफ्टवेअर सोल्युशन या कंपनी आणि गुन्हा दाखल असलेले उमेदवार यांना यातून बाद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड आला होता. राज्यभर गाजलेल्या नांदेड पोलीस भरती प्रक्रिया प्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक संदीप विषनोई यांनी यासाठीची घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचे आज आदेश दिले होते. याप्रकरणी १६ आरोपी अटक असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. परीक्षा रद्द करताना जाहीर केल्याप्रमाणे आत या भरतीसाठी नव्याने १६ मेला लेखी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासोबतच परीक्षा घोटाळ्यातील मुख्यधागा असलेली एसएसजी सॉफ्टवेअर सोल्युशन या कंपनीस या सर्व प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. तसेच गैरप्रकाराबाबत गुन्हे दाखल झालेल्या उमेदवारांना या परीक्षेत संधी देण्यात येणार नाही.

काय आहे प्रकरण नांदेड जिल्ह्यात ६९ पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च २०१८ ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत पोलीस  मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी पेपर जाणीवपूर्वक कोरे सोडले. या पेपर तपासणीच्यावेळी ओएमआर पद्धतीच्या पत्रिका भरती प्रक्रियेत संगणकीय विभागात काम करणाऱ्या   आॅपरेटर्समार्फत उमेदवारांच्या रिकाम्या उत्तरपत्रिकेवर योग्य उत्तरे भरुन जवळपास ९० गुण प्राप्त केले. 

या भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासाठी औरंगाबादचे आयआरबी विभागाचे पोकॉ नामदेव ढाकणे, राज्य राखीव दलाच्या जालना येथील ग्रूप ३ चे पोकॉ शुक्राचार्य बबन टेकाळे, शेख आगा, सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल दिलीप साळुंके, ओएमआर आॅपरेटर प्रवीण भाटकर आणि दिनेश गजभारे यांनी सहकार्य केले तर भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या ओमकार संजय गुरव, कृष्ण काशिनाथ जाधव, शिवाजी श्रीकृष्ण चेके, कैलास काठोडे, आकाश दिलीप वाघमारे, सलीम मोहमद शेख, समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के, सुमित दिनकर शिंदे, मुकीद मकसुद अब्दुल, हनुमान मदन भिसाडे, रामदास माधवराव भालेराव आणि संतोष माधवराव तनपुरे यांनी भरती होण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये देण्याचे कबूल केले आणि खोटे दस्तावेज तयार करुन मूळ दस्तावेजाजागी ते खरे म्हणून वापरले. यात शासनाची फसवणूक केली.

असा झाला घोटाळा उघड  या परीक्षेत पोलीस भरतीसाठी परीक्षा दिलेल्या समाधान सुखदेव मस्के आणि किरणअप्पा मस्के  या दोघांना समान गुण मिळाले. हे दोघेही राहणार देऊळगाव राजा तालुक्यातील होते. या दोघांसह देऊळगाव राजा येथील अन्य पाच जणही लेखी परीक्षेत ९० गुणांपर्यंत पोहोचले होते. एकाच गावातील सर्वांना जवळपास सारखे गुण मिळणे ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी लेखी परीक्षेदरम्यान छायाचित्रण तपासले. या छायाचित्रणात सदर परीक्षार्थी उत्तरे सोडविण्याऐवजी इतरत्र पाहत निवांत होते. परीक्षेचा कोणताही ताण त्यांच्यावर नव्हता. हे छायाचित्रण तपासल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या. त्यात उत्तरे लिहिल्याचे आढळले होते. त्यामुळे एकूणच हा प्रकार संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका पोलिसांनी परत घेतल्या होत्या. त्या प्रश्नपत्रिकेवर आकडेमोड करण्यासाठी काही जागा सोडली होती. त्या जागेवर या उमेदवारांनी कोणतीही आकडेमोड केली नसल्याचेही तपासात पुढे आले. अधिक चौकशीत या भरती प्रक्रियेत संगणकीय विभाग सांभाळणाऱ्या एसएसडी सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह ओएमआर आॅपरेटर आणि पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे उघड झाले.

टॅग्स :Nanded policeनांदेड पोलीसexamपरीक्षाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार