हिमायतनगर : तालुक्यातील मौजे वाघी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़याच गावातील शेतकरी बालाजी विठ्ठल हमंद (वय ४५) हे शेतीमधील प-हाट्या काढण्यासाठी गेले असता कापसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. बालाजी हामंद या शेतक-याच्या मांडीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धावून येत असल्याने दिसताच रानडुकराने धूम ठोकली़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतक-यास तात्काळ हिमायतनगर येथील रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे़जंगलातील पानवठे आटल्याने वन्यजीव पाण्यासाठी शेती व मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करत असून शेतातील पिके नष्ट करत असल्याच्या घटनांत वाढ होत आहे़ रानडुकरांमुळे गंभीर जखमी झालेल्या शेतक-याला वनविभागाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि तात्काळ या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे़या परिसरात अस्वल आणि जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून त्यामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़
रानडुकराचा हल्ला;शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:44 IST
तालुक्यातील मौजे वाघी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़
रानडुकराचा हल्ला;शेतकरी जखमी
ठळक मुद्देवाघीची घटना : आरडाओरड केल्यानंतर अस्वलाने ठोकली धूम