शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू, न्या. शिंदे, विभागीय आयुक्त उपोषणस्थळी दाखल
2
"...तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल", शरद पवारांचे मराठा आरक्षणाबद्दल केंद्राकडे बोट
3
Manoj Jarange Patil: शिंदे समितीने मनोज जरांगेंची घेतली भेट, आझाद मैदानातील उपोषणस्थळीच चर्चा
4
Asia Cup 2025 सुरू होण्याआधीच आली मोठी अपडेट; IND vs PAK सामन्यावरही होणार परिणाम
5
"आता तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?; दोन समाजात आगी लावून...!" संजय राऊतांचा फडणीसांवर थेट हल्ला
6
Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?
7
Gauri Pujan 2025: गौरीचा धागा व्यक्तिला आणि वास्तुला बांधण्याने होणारे लाभ माहीत आहेत का?
8
मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश होणार नाही, कारण...; भाजपा आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका
9
Video: NEET ची तयारी करणारी विद्यार्थिती कोचिंग सेंटरच्या छतावर चढली अन्...
10
Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा
11
दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार
12
अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात 'महाचर्चा'; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तासभर बैठक
13
अमेरिका 'या' देशावर हल्ला करण्याच्या तयारीत? दररोज पाठवतायेत सैन्य, आतापर्यंत ७ युद्धनौका तैनात
14
फडणवीसांचं वजन मोदींकडे, शिंदेंचं वजन शाह यांच्याकडे; संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊतांचा सवाल!
15
Gauri Avahan 2025: गौरी आवाहनापासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!
16
८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना  
17
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा; कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे..."; मनोज जरांगेंचा इशारा
18
शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' म्हणून जरांगेंकडे पाहतात; भाजपा आमदार संजय केनेकरांचं खळबळजनक विधान
19
Maratha Morcha Mumbai video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले
20
आंदोलने, धरणे अन् मोर्चे आझाद मैदानावरच का? मंत्रालय, सचिवालयापर्यंत परवानगी नाही; श्रेय उच्च न्यायालयाला

नांदेड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली; परतीच्या पावसाने दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:44 IST

वीस वर्षांत पाचव्यांदा सरासरी पूर्ण

ठळक मुद्दे यंदा ९५५ मि़ मी़ पाऊस  

नांदेड :  मागील दोन वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा कमी पडणाऱ्या पावसाने यावर्षी मात्र सरासरी ओलांडली आहे़ जिल्ह्यात परतीच्या पावसाने वार्षिक पावसाची टक्केवारी पूर्ण केली असून १ जून ते २० आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात  एकूण पावसाची नोंद ९५५ मि़मी़ झाली आहे़ 

यावर्षी पावसाचे  उशिरा आगमन झाल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या होत्या़ जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही़ त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी होती़ सप्टेंबर महिन्यात काही भागात समाधानकारक पाऊस झाला़ मात्र या पावसामुळे नदी, नाले व धरणात साठा उपलब्ध झाला नव्हता़ दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीक्षेत्रात झालेल्या पावसाने जायकवाडीचे धरण पूर्ण भरले़ त्यानंतर परभणी जिल्ह्यात  झालेल्या पावसावर विष्णूपुरी प्रकल्पात साठा उपलब्ध झाला़ मात्र पावसाची वार्षिक सरासरी कमीच होती़ मागील दोन वर्षात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता़ त्यापेक्षाही यंदा अवघड परिस्थिती निर्माण झाला होती़  

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५५ इतके आहे़ २० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ६८५़८८ मि़मी़ म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७४़४३ टक्के पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर या टक्केवारीत कासवगतीने वाढ होवू लागली़ परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात चांगली साथ दिली़ त्यामुळे  ९० टक्क्यापर्यंत पावसाची नोंद झाली़ मात्र रविवारी झालेल्या पावसाने  सरासरी ओलांडली आहे़ रविवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने मागील दोन वर्षांचा रेकॉर्ड मोडला़  १ जून ते २० आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ९५५ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ २०१८ मध्ये ८३८ मि़ मी़ तर २०१७ मध्ये ७८८़५ मि़मी़ पाऊस झाला होता़ गत वीस वर्षांत  २००६, २००५, २०१०,२०१३ व २०१६ यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता़ 

सुरुवातीला तीन नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे ५० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या़  दीड महिन्यांच्या खंडामुळे  पेरण्या होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता़ मात्र आॅगस्टच्या अखेर १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या़ नंतर टप्याटप्प्याने पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक चांगले आले़ परंतु परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले़ 

गत दोन वर्षांत झाला सरासरीपेक्षा कमी पाऊसमागील २० वर्षांत पडलेल्या वार्षिक पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- १९९९-८७० मि़ मी़, २०००-७५३ मि़मी़, २००१-६५५ मि़ मी़ , २००२- ८७६ मि़ मी़, २००३-९५६ मि़ मी़, २००४- ५०३ मि़मी़, २००५- ९७३ मि़मी़, २००६- १३७८ मि़मी़, २००७- ८९६ मि़मी़, २००८- ४९८ मि़मी़, २००९- ५३७ मि़मी़, २०१०- १२१५ मि़मी़, २०११- ६७४ मि़मी़, २०१२- ५७८ मि़ मी़, २०१३- १२२३ मि़ मी़, २०१४- ४४० मि़मी़, २०१५-  ४५७ मि़मी़, २०१६- ११२३ मि़मी़, २०१७-७८८ मि़मी़, २०१८- ८३८ मि़ मी़, २०१९- ९५५ मि़मी़  

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसagricultureशेती