शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल, नांदेड-पुणे सर्वाधिक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:27 IST

उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़

ठळक मुद्देट्रॅव्हल्सच्या तिकिटात दुप्पट, तिप्पट वाढ

नांदेड : उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़मराठवाड्यातील प्रमुख दोन शहरांपैकी नांदेड एक असून नांदेड स्थानकातून जवळपास देशाच्या कानाकोपºयात जाणाºया रेल्वे धावतात़ परंतु, उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांची झालेली गर्दी पाहता नांदेडातून धावणाºया सर्वच गाड्यांना तुडुंब गर्दी आहे़ प्रवाशांना लांब पल्ल्यासाठी आरक्षण आवश्यक असते़ परंतु, नांदेड येथून धावणाºया जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांचे वेटींग शंभर ते तीनशेपर्यंत पोहोचले आहे़ तपोवन एक्स्प्रेस शंभर ते एकशे तीस, देवगिरी एक्स्प्रेस - १५० ते १६५ आणि नंदीग्राम एक्स्प्रेसला २२० ते २९० पर्यंत वेटींग आहे़ त्यातच नांदेडहून पुण्यासाठी असलेल्या पुणे एक्स्प्रेसची वेटींग लिस्ट दीडशेंच्या घरात राहत आहे़ सदर वेटींग जवळपास जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम आहे़ त्यामुळे ऐनवेळी मुंबई, पुणे प्रवास करणाºया प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय राहत नाही़नांदेड येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, नागपूर, हैदराबाद, शेगाव या मार्गावर आरामदायी तसेच शिवशाही बसेस चालविण्यात येतात़ परंतु, खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत शिवशाहीचे तिकीट अधिक आहे़ त्यामुळे बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात़ मात्र, उन्हाळी सुट्यांमुळे सध्या खासगी ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल धावत असल्याने सध्या शिवशाहीसह इतरही बसेसला तुडुंब गर्दी पहायला मिळत आहे़नांदेड शहरातून पुणेसाठी दररोज पन्नासहून अधिक ट्रॅव्हल्स धावतात़ यामध्ये सध्या मोठी वाढ झाली असून दुहेरी तिकिटाच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे़ पुण्यासाठी ५०० ते ७०० रूपये तिकीट स्वीकारणाºया ट्रॅव्हल्स कंपन्या सध्या १००० ते १८०० रूपये भाडे घेत आहेत़शिवशाही बस उरली नावालाचमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली शिवशाही आता नावालाच ‘शिवशाही’ राहिली आहे़ शिवशाही गाड्यांची अवस्था भंगार होत असून याकडे एस.टी. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़मराठवाड्यातील मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षनांदेड विभागातून मुंबई, पुण्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस सोडण्याच्या प्रवाशांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे़ मुंबई, पुणे मार्गावर नेहमीच गर्दी असते़ त्यात उन्हाळी सुट्या आणि दिवाळीमध्ये चार ते पाच पट वाढ होते़यानिमित्त विशेष गाडी चालविण्याचे नियोजनही रेल्वे प्रशासन करीत नाही़ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि नांदेडच्या रेल्वे अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या लोकप्रतिनिधींकडून होणाºया आरोपात तथ्य वाटते़

टॅग्स :Nandedनांदेडstate transportएसटी