शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST

ज्वारीची काढणी सुरू भोकर : तालुक्याच्या विविध भागात सध्या मळणी यंत्रणाद्वारे ज्वारीची काढणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने ...

ज्वारीची काढणी सुरू

भोकर : तालुक्याच्या विविध भागात सध्या मळणी यंत्रणाद्वारे ज्वारीची काढणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ज्वारीला त्याचा फटका बसला. या आठवड्यात ज्वारीची कापणी करून शेतकऱ्यांनी ती वाळवत ठेवली होती. पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मळणी यंत्राच्या साहायाने ज्वारीची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली.

९५ टक्के लसीकरण

किनवट- प्राथमिक आरोग्य केंद्र देहली अंतर्गत येणाऱ्या मौजे दहेली येथे ९५ टक्के कोरोना प्रतिबंधक लसीचे काम पूर्ण झाले. सरपंच राकेश तोटावाड, उपसरपंच प्रमोद काळे, आरोग्य सेविका कटकमवार, काळे यांनी गावात जनजागृती करून लसीकरण केले. गावात ९५ टक्के लसीकरण झाल्याची माहिती सरपंच तोटावाड यांनी दिली. या मोहिमेत अंगणवाडी सेविका सुलोचना कमटलवार, प्रतिभा पाटील, लता लोंढे, सुनीता बोंतावार, ललिता कचरे यांनीही सहभाग नोंदविला.

वीज कोसळून मृत्यू

लोहा : तालुक्यातील भुलयवाडी येथील सोनेराव संजय चव्हाण (वय १७) याचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. शेतामध्ये कांदे काढणीचे काम संजय करीत असताना ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

रुग्णवाहिका भेट

मालेगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाली आहे. जि. प. सदस्या संगीता अटकोरे यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. धनगे यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली होती. अटकोरे यांनी पाठपुरावा केला होता. याप्रसंगी अनिल इंगोले, उपसरपंच मनोहर खंदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. धनगे, अमर नाईक, आदी उपस्थित होते.

५०० जणांचे लसीकरण

उमरी : १८ वर्षे वयोगटातील सुमारे ५०० जणांचे लसीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मारोती चव्हाण यांनी दिली. ६ मे रोजी उमरी ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष कदम, डॉ. अर्जुन शिंदे यांचीही उपस्थिती होती.

कोविड सेंटर सुरू करा

किनवट : तालुक्यातील शिवणी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी सरपंच लक्ष्मीबाई डुडुळे यांनी केली आहे. एखादा गंभीर कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला किनवटला पाठवावे लागते. त्यामुळे शिवणीलाच कोविड सेंटर सुरू करण्याची गरज डुडुळे यांनी व्यक्त केली.

रस्त्याची दुरवस्था

देगलूर : देगलूर ते हनुमान हिप्परगा या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वारंवार अपघात घडत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तालुक्यातील शहापूर, सुंडगीर, हावरगा, नरंगल, मंडगी, सांगवी उमर, मेदनकल्लूर, शेळगाव, शेवाळा, आलूर या गावचे नागरिक ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.

१० विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

नांदेड : सिडको परिसरातील जवळपास १० प्रतिष्ठानांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड ठोठावण्यात आला. जवळपास ३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पथकप्रमुख रमेश चवरे, गिरीश काठीकर, पुरुषोत्तम कामतगीरकर, रतीश टुटेजा, गजानन ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी ही कारवाई केली.

चढ्या दराने खताची विक्री

देगलूर : तालुक्यातील हाणेगाव परिसरात सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात झाली. काही कृषी केंद्रावरून चढ्या दराने खताची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी भरडला जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, तर दुसरीकडे व्यापारी लूट करीत असल्याने शेतकरी संतप्त झाला. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.