शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनदरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:35 IST

केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग वर्षभरापूर्वी लागू करण्यात आला असला तरी महापालिका कर्मचाऱ्यांना तो लागू झाला नव्हता.

ठळक मुद्देकोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षाप्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून ३ नोव्हेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

नांदेड : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शासनदरबारी पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मनपा कर्मचाऱ्यांचे  दिवाळी फटाके जोरात फुटण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.     

केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग वर्षभरापूर्वी लागू करण्यात आला असला तरी महापालिका कर्मचाऱ्यांना तो लागू झाला नव्हता. यापूर्वी दोनवेळा हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, प्रस्तावातील त्रुटीमुळे हा प्रस्ताव दोनवेळा शासनाने महापालिकेला परत पाठविण्यात आला होता. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षाच होती. यापूर्वी पाठविलेल्या प्रस्तावात शासनाने त्रुटी काढून तो १६ ऑक्टोबर रोजी महापालिकेला परत पाठविण्यात आला होता. आता या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून ३ नोव्हेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांची  दिवाळी जोरात साजरी होणार आहे. महापालिकेत आजघडीला १ हजार ४९३ कायम कर्मचारी आहेत. तर ८५ कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करीत आहेत. 

महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २१ ऑक्टोबर रोजी आयुक्त डॉ. लहाने यांची भेट घेवून सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच मनपातील पदांचा आकृतीबंध मंजूर करावा अशी मागणी केली होती. करमूल्य निर्धारण अधिकारी अजितपालसिंघ संधू, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग, राजेश चव्हाण, प्रकाश कांबळे, झुल्फेकार अहमद आदींनी सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी लवकरच हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन  दिले होते. सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला असला तरी शासनस्तरावर प्रस्तावाला कधी मंजुरी  मिळेल याकडे आता मनपा  कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले.

सत्ता बदलानंतर हालचालींना वेगमहापालिकेच्या कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी १ जानेवारी २०२० रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा यांनी पत्र दिले होते. पालकमंत्री चव्हाण यांनीही शासनस्तरावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत पत्र दिले होते. सत्ता बदलानंतर सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंध मंजुरीचा प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाfundsनिधीNandedनांदेड