शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॅन्सरमुक्तीचा संकल्प, तलाठी सज्जाच्या निर्मितीने कामांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:45 IST

ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे.

नांदेड : जिल्ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे.जिल्ह्यात कॅन्सरमुक्तीसाठी प्रशासनाने नवी सुरूवात केली आहे. उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर तज्ज्ञांच्या मदतीने होत असलेल्या कॅन्सर शिबिरात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णांची तपासणी केल्यानंतर वेळेवर कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचाराचा मोकळा होत आहे. कॅन्सर या रोगात निदान उशिरा झाल्याने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.जिल्ह्यात यंदा ८० टक्के पाऊस झाला असला तरीही देगलूर, मुखेड, उमरी या तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्याचवेळी लोहा, नायगाव, कंधार या तालुक्यांत पाणीटंचाईचे मोठे सावट उद्भवले आहे. परतीचा पाऊस जिल्ह्यात यंदा झालाच नसल्याने रबीची पेरणीही कमी प्रमाणात झाली आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामही सुरू असले तरी या योजनेसाठी मिळणारा लोकसहभाग मात्र अत्यल्पच आहे. त्यामुळे ही योजना प्रशासकीयच ठरली आहे.मावळत्या वर्षात सर्वाधिक चिंता महसूल विभागाला कृष्णूर येथील मेगा धान्य घोटाळ्याने सतावली. या प्रकरणाने महसूल विभागाची मोठी नाचक्की झाली. हे प्रकरण अद्यापही चौकशीवरच आहे.पुरवठा विभागाने केलेल्या आॅनलाईन प्रणालीच्या वापराची नोंद देशभरात घेण्यात आली आहे. जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणूनही केंद्र पातळीवर निवड झाली आहे. आॅनलाईन प्रणालीद्वारे धान्य वाटप तसेच डाटा संगणकीकरणाचे प्रमाणही चांगले राहिले आहे.प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांसाठी उभारी योजनेअंतर्गत नव्या योजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाने मावळत्या वर्षात थेट आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी जावून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळाला की नाही? याची माहिती घेतली. पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जून-जुलैपासूनच कामाला लागले आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम, व्हीव्हीपॅट प्रशिक्षण यासह निवडणूक ओळखपत्रांच्या अद्ययावतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. यामध्ये रिक्त पदांची चिंता कायमच राहिली.पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाची स्थानिक सत्ताधारी आणि पालकमंत्री यांच्यात मोठी गोची झाली आहे. याचे मोठे उदाहरण महापालिकेचा दलित वस्ती निधी मंजुरी प्रकरण आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आहेत. या बैठकामध्ये प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. इतकेच नव्हे, स्थानिक अधिकाºयांनी मनपाच्या दलित वस्ती योजनेच्या कामाची चौकशी करुन अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल असमाधानकारक असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी मंत्रालयस्तरावर या कामाची चौकशी लावली आहे. त्यातच जिल्हा परिषद पदाधिकाºयांनीही पालकमंत्र्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. यात कोंडी मात्र प्रशासनाचीच होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNanded zpनांदेड जिल्हा परिषदNanded policeनांदेड पोलीस