शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खाजगी कोरोना रुग्णालये गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:59 IST

coronavirus news ही रूग्णालये बंद झाल्यावर खाजगी डॉक्टरांना शासकीय रूग्णालयात सेवा देण्याचा पर्याय जिल्हाधिकार्यांनी उपलब्ध करून दिला आहे. रूग्णसंख्या कमी होताच प्रशासनाला सूचना

ठळक मुद्देविविध रुग्णालयांत सध्या २७६ खाटा रिकाम्यारूग्णसंख्या कमी होताच प्रशासनाला सूचना

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत असताना कोरोना उपचारासाठी खाजगी रूग्णालयेही त्याच वेगाने निर्माण झाले होते. आता ही रूग्णालये गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असून याबाबत बुधवारी जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत खाजगी रूग्णालयांनी तसे  संकेत दिले. खाजगी डॉक्टरांनी शासकीय रूग्णालयात सेवा द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केल्या आहेत.

मार्चच्या दुसर्या आठवड्यापासून उद्भवलेल्या कोरोना संकटात नांदेड जिल्हा प्रारंभीच्या जवळपास एक ते दीड महिना हा ग्रीन झोनमध्ये राहिला. २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद शहरातील पीरबुर्हाणनगर येथे झाली. त्यानंतर जुलैनंतर कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने  वाढ होत राहिली. ही परिस्थिती पाहून खाजगी रूग्णालयेही उपचारासाठी सरसावली होती. आजघडीला जिल्ह्यात १२ खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनावरील उपचारासाठी या रूग्णालयांना महापालिकेची परवानगी आहे. मात्र आता रुग्णसंख्या घटत असल्याने या रुग्णालयांनी कोविड विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

ही रूग्णालये बंद झाल्यावर खाजगी डॉक्टरांना शासकीय रूग्णालयात सेवा देण्याचा पर्याय जिल्हाधिकार्यांनी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा रूग्णालय, शासकीय रूग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमध्येही या डॉक्टरांना गरजेनुसार सेवा बजावता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात ७४ हजार ७९३ संशयीत रूग्णांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात १७ हजार ६९८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर १५ हजार १५६ जणांनी कोरोनावर मात केली. 

विविध रुग्णालयांत सध्या २७६ खाटा रिकाम्याजिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८८ टक्यांवर पोहोचले आहे. रूग्णसंख्या वाढीच्या काळात रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी धावपळ करावी लागल्याचे चित्र होते. पण आज शासकीय रूग्णालयासह १२ खाजगी कोरोना रूग्णालयांत ९८ आयसीयु बेड रिकामे आहेत. साध्या बेडची उपलब्ध असलेली संख्या १७८ इतकी आहे. त्यामुळे आता खाजगी रूग्णालयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोरोना उपचार विभाग बंद करण्याबाबतचे संकेत दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड