शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाचे १७ भरारी पथके स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:31 IST

बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बोगस बियाणे संदर्भात, साठवणूक आदी बाबत कृषी विभागाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बोगस बियाणे संदर्भात, साठवणूक आदी बाबत कृषी विभागाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळसह राज्यात मोठया प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच.टी. बी.टी. कापूस बियाणांची अवैधरित्या मोठया क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती.आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच गुजरात राज्यातून या बियाण्याचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. त्यामुळे हंगामात एच. टी. बियाणे अवैधरित्या शेतकºयांपर्यंत पोहचणार नाही, या करीता कृषी विभागामार्फत जिल्हा स्तरावर १ व तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना केली आहे.क्षेत्रीय कर्मचाºयांच्या माध्यमातून जागृती अभियान राबविले जात आहे. तसेच शेतकºयांनी अवैध व पर्यावरण विरोधी एच.टी. बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये व लागवड करु नये. जर एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री, साठवणूक, बुकींग बाबत माहिती प्राप्त झाल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ तसे कृषी विभागातील अधिकाºयांशी व पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधावा.शेतकºयांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये व संभाव्य नुकसान टाळण्याकीरता मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती कृषी व पशुसंवर्धन समितीचे रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी यांनी केले आहे.शेतकºयांनी ही खबरदारी घ्यावीखरीप हंगाम २०१८ मध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी खरेदी करताना शेतकºयांनी, गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करा. पावतीवर शेतकºयांची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावत्या सांभाळून ठेवाव्यात. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन,पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुदत पाहून घ्या. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल,एस.एम.एस.,द्वारे कराव्यात. तक्रारी सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० वर संपर्क साधावा.

टॅग्स :MarketबाजारNandedनांदेड