यंदाचा हा १७ वा मेळावा आहे. नोंदणी केलेल्या नियोजित वधू-वरांचा समावेश परिचय पुस्तिकेमध्ये करण्यात येईल. नोंदणी नि:शुल्क आहे. मराठा समाजातील उच्चशिक्षित विवाहयोग्य वधू-वरांना त्यांच्या अनुरूप योग्य असा जोडीदार निवडता यावा, यासाठी १६ वर्षांपासून नि:शुल्कपणे हा मेळावा घेण्यात येतो. त्याला समाजबांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून मेळावा घेतला जाणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी हनुमान मंदिर, मंगल कार्यालय, विजयनगर नांदेड येथे करावी, असे आवाहन मराठा वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव प्रा. संतोष देवराय, उपाध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, शिवाजीराव खुडे, ॲड. एल.जी. पुयड, राजश्री पाटील, कल्पना डोंगळीकर यांनी केले आहे.