लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; तीन केंद्रांवर दोघींनीच घेतला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:15+5:302021-07-21T04:14:15+5:30
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत ७ लाख ५४ हजार ९८३ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे. त्यात २० जुलै रोजी दिवसभरात जिल्ह्यात ...
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत ७ लाख ५४ हजार ९८३ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे. त्यात २० जुलै रोजी दिवसभरात जिल्ह्यात ९ हजार ५५५ जणांना लस देण्यात आली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, गर्भवती महिलांनी विविध गैरसमजातून कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटणकर यांनी बैठक घेऊन सदर प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या.
कोरोना लस घेतल्यानंतर होणारा त्रास आणि त्यामुळे घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या, याचा बाळासह मातेवर परिणाम होईल, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आजपर्यंत लस घेतली नाही. परंतु, डाॅक्टरांनी समजून घेतल्याचे आता लस घेणार.
- कल्पना कदम
कोरोना लस घेतली की अहवाल पाॅझिटिव्ह येतो. त्या लसीचा परिणाम बाळावर होऊ शकतो. या भीतीतून लस घेतली जात नव्हती. मात्र, आरोग्य केंद्रातील सिस्टर, डाॅक्टर यांनी समजावून सांगितल्याने लस घेतली. कोणताही त्रास नाही.
- ऐश्वर्या जाधव
न घाबरता घ्या लस
कोरोना लस गर्भवती माता व बाळ यांच्या आरोग्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. कोणतेही परिणाम नाहीत ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक महिलेने लस घेऊन स्वत:सह बाळाला सुरक्षित करावे.
- डाॅ. व्ही. आर. जीने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी