शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांनी धनगर आरक्षणाबाबतची भुमिका स्पष्ट करावी; धनगर विवेक जागृती अभियानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:19 IST

नांदेड : मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगरांना केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर ...

नांदेड : मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगरांना केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारनेही मागील साडेचार वर्षात तेच केले. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर देखील धनगरांच्या आक्षणाच्या मुद्यावरून समाजाला गोंधळात टाकत आहेत. त्यांनी एक विचारवंत नेते आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख या नात्याने धनगरांच्या आरक्षणाचे राजकारण न करता आपली भुमिका स्पष्ट करावी, असे मत धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडले आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड येथे १७ जानेवारी रोजी जाहिर सभा आयोजित केली आहे. या सभेला अॅड.प्रकाश आंबेडकर हे संबोधित करत असून त्या पार्श्‍वभूमिवर विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण डॉ. बाबासाहेबांनीच दिले आहे. परंतु राजकिय मंडळींनी ते मिळू दिले नाही. काँगे्रस- राष्ट्रवादीने 60 वर्षे फसविले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनेही धनगरांना साडेचार वर्षे आरक्षणाचे गाजर दाखवून फसविले. आता मात्र धनगर समाजाला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही. डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून धनगरांना दिलेले आरक्षण त्यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर लागू करतील, तसेच धनगर आणि धनगड एकच आहेत, असे धनगर समाजाचे आणि वंचित आघाडीतील धनगर कार्यकर्त्यांचे मत आहे, त्याच्याशी आंबेडकर सहमत आहेत काय, प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षणावर ठोस भुमिका घेतात. मात्र धनगर आरक्षणावरती भुमिका का घेत नाहीत, असा सवालही ढोणे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDhangar Reservationधनगर आरक्षणElectionनिवडणूक