शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

ईश्वरचिठ्ठीने आली काँग्रेस-राष्ट्रवादीची माहूरमध्ये सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:43 IST

माहूर नगर -पंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे यांची निवड झाली़ ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली़

ठळक मुद्देनगराध्यक्षपदी शीतल जाधव उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे

श्रीक्षेत्र माहूर : माहूर नगर -पंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे यांची निवड झाली़ ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली़विद्यमान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक घेण्यात आली़ नगराध्यक्षपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते़ या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शीतल जाधव, भाजपातर्फे दीपाली लाड यांनी अर्ज दाखल केला होता़ नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करत काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमचा प्रत्येकी एक नगरसेवक असे तीन नगरसेवकांना फोडण्यात यश मिळविले़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ८ तर भाजपा-शिवसेनेकडेही ८ नगरसेवक झाल्याने ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले़ यात शीतल जाधव यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली़ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही तेच घडले आणि ईश्वरचिठ्ठीने अश्विनी आनंद तुपदाळे यांची निवड झाली़ पिठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काम पाहिले़ त्यांना माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, मुख्याधिकारी विद्या कदम यांनी सहकार्य केले़ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने शिवसेनेशी कास धरली तरी ईश्वरचिठ्ठीतून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नगरसेवकांची नावे निघाली़ नगर पंचायतीमध्ये भाजपा-सेनेची सत्ता ईश्वरलाही मान्य नव्हती, अशी चर्चा यानंतर माहूर शहरात सुरू झाली़ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ़ प्रदीप नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा़ राजेंद्र केशवे, विशाल जाधव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमच्या नगरसेवकाला नागरिकांनी निवडून दिले असले तरीही ऐन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या तिघांनी शिवसेनेशी कास धरल्याने मतदारांचा अपेक्षाभंग झाला असे म्हटले जात आहे़ शिवसेनेचे ज्योतिबा खराटे, भाजपाचे अ‍ॅड़रमण जायभाये, सुमित राठोड यांनी प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी निराशा पडली़

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक