शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये समन्वयाने होणार पोलिसांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:27 IST

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़

ठळक मुद्देराज्यात पहिलाच प्रयोग : पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :पोलीस दलात सध्या बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आवडीचे ठाणे मिळविण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत़ तर पसंतीच्या ठिकाणी बदली मिळेल की नाही? यामुळेही अनेक कर्मचारी तणावात आहेत़ त्या सर्वांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़मे महिन्यात सर्व विभागांमध्ये बदल्यांचा हंगाम सुरु होतो़ त्यामध्ये पोलीस दलाचाही समावेश असतो़ त्यामुळे या महिन्यात कार्यकाळ पूर्ण करणारे सर्वच कर्मचारी बदलीच्या तणावात असतात़ त्यात पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी ज्या ठिकाणी बदली करतील त्याच ठिकाणी कर्मचाºयांना रुजू व्हावे लागते़ त्यामुळे कुटुंब, मुलांचे शिक्षण एका टोकाला अन् नोकरी दुसºया टोकाला अशी विचित्रावस्था कर्मचाºयांची होते़त्याचा परिणाम कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवर होतो़ त्यातच कामाच्या तणावामुळे त्यांना पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते़ त्यातून पसंतीच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी कर्मचारी शक्य ते सर्व हातखंडे वापरतात़ यावर तोडगा म्हणून पोलीस अधीक्षक मीना यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़त्यामध्ये रिक्त पदे, पदांची आवश्यकता, उपलब्धता आणि पोलीस कर्मचारी यांनी दिलेली पसंतीची ठाणी या सर्वांची सांगड घालून सर्वसाधारण बदल्या केल्या जाणार आहेत़ पोलीस कर्मचाºयांनी बदलीसाठी केलेला अर्ज घेवून २८ मे रोजी सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहावयाचे आहे़ एकाच तालुक्यात खंडित व अखंडित दहा वर्षे सेवा कर्मचाºयाची झाली असेल आणि इतर शाखेत तीन वर्षे सेवा पूर्ण केली आहे़ अशा कर्मचाºयांनी बदलीसाठी अर्ज केले असतील तर त्यांना २९ व ३० मे रोजी बोलाविण्यात येणार आहे़ या ठिकाणी समन्वयाने कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ त्यामुळे पसंतीचे ठाणे मिळण्यासाठी कर्मचाºयांना कराव्या लागणाºया कसरतीतून यंदा सुटका मिळणार आहे़ त्याचबरोबर बदलीची प्रक्रियाही पारदर्शक होणार आहे़ त्यामुळे या निर्णयाचे पोलीस कर्मचाºयांनी स्वागत केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसTransferबदली