शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची खात्यांतर्गत परीक्षा ऑक्टोबरमध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

नांदेड- २०१८ पासून पोलीस दलात खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यात ही परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा ...

नांदेड- २०१८ पासून पोलीस दलात खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यात ही परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले होते. परंतु पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही परीक्षा तूर्त रद्द होणार नसल्याचे सांगितले होते. त्यात आता ७६५ पदांसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यासंदर्भात पत्र त्यांनी लोकसेवा आयोगाला पाठविले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

पोलीस दलात वेळेवर प्रमोशन मिळत नाही. त्यामुळे अनेक वर्षे कर्मचारी त्याच जागेवर राहतो. सेवानिवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षकापर्यंतही पोहोचत नाही. त्यामुळे यात बदल करण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. महासंचालक पांडे यांनी त्यासाठी १०-२०-३० असा प्रस्ताव पाठविला आहे. त्यात पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेला कर्मचारी दहा वर्षांनंतर हवालदार, २० वर्षांनंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि ३० वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षक होणार. या निर्णयामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रमोशनची संधी मिळणार आहे. तर दुसरीकडे परीक्षा रद्द केल्याची चर्चा सुरु होती, परंतु महासंचालकांनी खात्यांतर्गत २५ टक्के पोलीस उपनिरीक्षकांची भरती ही परीक्षेतून होणार असून २०२४ पर्यंत ती चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला तीन संधी देण्यात येणार आहे, परंतु नव्याने भरती होणाऱ्यांना ही संधी मिळणार नाही असेही स्पष्ट केले होते. खात्यांतर्गत सरळसेवा मर्यादित पोलीस उपनिरीक्षकांच्या मंजूर २ हजार ४६५ पदांपैकी सेवाज्येष्ठता यादीनुसार १ हजार ९१७ प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तर २०२७ च्या परीक्षेअन्वये ३२२ पदे भरण्यात आली आहेत.

चौकट- १६२ फौजदार प्रशिक्षणावर

२००६ ते २०१३ (२०१२ वगळून) १६२ जणांचेही प्रशिक्षण सुरु आहे. त्यात आता ७६५ रिक्त पदांसाठी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे.

डीजी होम लोनसाठी २१ कोटी ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच ६०० कोटी रुपये बँकेकडून मिळणार आहेत. तर युनिफाॅर्म अलाऊन्ससाठी ७१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.