शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदाराकडून १० लाखांची लाच घेणाऱ्या जीएसटी उपायुक्ताला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:22 IST

कारखान्याचे परताव्यापोटी ३ कोटी ५३ लाख रुपये परत येणार होते़

ठळक मुद्दे५ जानेवारीला कारखानादारासोबत झालेल्या पहिल्याच भेटीत दहा लाख रुपयांची मागणी६ जानेवारी हॉटेल ड्रिमलँड येथे देशमुख यांनी लाच स्वीकारली होती़ 

नांदेड : कारखान्यासाठी खरेदी केलेली मशिनरी आणि इतर साहित्यासाठी भरण्यात आलेल्या व्हॅटचा परतावा व्याजासह परत देण्यासाठी अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जीएसटी उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांना मंगळवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कारखान्याचे परताव्यापोटी ३ कोटी ५३ लाख रुपये परत येणार होते़

पूर्णा येथील एका कारखानदाराने २०१३ मध्ये मशिनरी आणि इतर साहित्य खरेदी केले होते़ त्यावेळी व्हॅट ही करप्रणाली होती़ यावेळी भरण्यात आलेला व्हॅट व्याजासह परत मिळविण्यासाठी परभणी येथील वस्तू व सेवाकर कार्यालयातून फाईल मागवून नागपूर कार्यालयाकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यासाठी जीएसटी उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांनी ५ जानेवारीला कारखानादारासोबत झालेल्या पहिल्याच भेटीत दहा लाख रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली़ ६ जानेवारी रोजी सायंकाळी हॉटेल ड्रिमलँड येथे खोली क्रमांक २०६ मध्ये देशमुख यांनी लाच स्वीकारली होती़ 

या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ मंगळवारी देशमुख यांना न्या.़ के. एऩ गौतम यांच्यापुढे हजर करण्यात आले़ यावेळी न्यायालयाने देशमुख यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ देशमुख हे पूर्वी पोलीस उपनिरीक्षक या पदावर होते़ पुढे स्पर्धा परीक्षेद्वारे ते सेल टॅक्स विभागात रुजू झाले होते़ 

असा रचला होता सापळादेशमुख यांनी तक्रारदाराला दहा लाख रुपये घेऊन हॉटेल ड्रिमलँडच्या खोली क्रमांक २०६ मध्ये येण्यास सांगितले़ तक्रारदार पैशाची बॅग घेऊन त्यांच्या खोलीत गेले़ त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तीन कर्मचारी गॅलरीत थांबले होते़ तक्रारदार खोलीत गेल्यानंतर देशमुख यांनी पैशाला हात न लावता ती बॅग समोरच्या टेबलवर ठेवण्यास सांगितले़ त्यानंतर तक्रारदारालाच ती बॅग आपल्या आलमारीत ठेवायला लावली़ त्यानंतर तक्रारदाराने बाहेर पडताच खिशातील रुमाल खाली टाकून एसीबीच्या कर्मचाऱ्यांना इशारा केला़ तोच कर्मचाऱ्यांनी देशमुख यांना ताब्यात घेतले़

उस्मानाबादसह इतर ठिकाणच्या संपत्तीची चौकशीदेशमुख हे यापूर्वी कार्यरत असलेल्या प्रत्येक ठिकाणच्या संपत्तीची चौकशी एसीबीकडून सुरु करण्यात आली आहे़ देशमुख हे उस्मानाबादचे असल्यामुळे त्या ठिकाणीही जमीन व इतर मालमत्तांची चौकशी सुरु झाली आहे़ त्याचबरोबर त्यांच्या व कुटुंबियांची बँक खात्याची झाडाझडतीही सुरु करण्यात आली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणGSTजीएसटीNandedनांदेड