शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडातच मिळणार आता पासपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:29 IST

नांदेड येथून सध्या हैदराबाद आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे़ या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस अमृतसरसाठी विमानाचे उड्डाण होते़ ही सेवा दिल्लीसाठी सुरु करावी अशी मागणी असतानाच, आता नांदेडमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे़ माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मानले जात आहे़ येत्या ५ एप्रिलपासून शहरातच पासपोर्ट मिळणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड येथून सध्या हैदराबाद आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे़ या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस अमृतसरसाठी विमानाचे उड्डाण होते़ ही सेवा दिल्लीसाठी सुरु करावी अशी मागणी असतानाच, आता नांदेडमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे़ माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मानले जात आहे़ येत्या ५ एप्रिलपासून शहरातच पासपोर्ट मिळणार आहे़

नांदेड येथे पासपोर्ट सेवा सुरु करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती़ या अनुषंगाने खा़अशोकराव चव्हाण यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून नांदेडमध्ये सदर कार्यालय सुरु करावे अशी विनंती केली होती़ याबरोबरच या मागणीचा पाठपुरावाही त्यांनी केला़ या अनुषंगाने पासपोर्ट कार्यालय नांदेडमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ मागील वर्षी राज्यातील सात जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्याचे जाहीर करण्यात आले होते़ त्यातील जालना, बीड, अहमदनगर येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाले असून नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालय येथे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़ अर्जदारांनी पासपोर्टसाठी आॅनलाईन फॉर्म दाखल केल्यानंतर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेनुसार नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात संबंधित अर्जदारास मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे लागणार आहे़ येथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून फिंगर प्रिंट फोटो काढण्याचे काम केले जाईल़ त्यानंतर पोलीस पडताळणी होवून अर्जदाराला त्याच्या घरच्या पत्त्यावर पासपोर्ट उपलब्ध होईल़ नांदेड पोस्ट विभागाचे अधीक्षक एस़एम़अली यांनीही सदर पासपोर्ट केंद्र सुरु करण्याच्या सूचना मिळाल्याचे सांगितले़

पोस्टातील दोघांनी घेतले पासपोर्टचे प्रशिक्षणनांदेडमधील पोस्ट कार्यालयात येत्या ५ एप्रिलपासून पासपोर्ट उपलब्ध होणार आहे़ या अनुषंगाने नांदेड पोस्ट कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी २१ ते २३ मार्च या कालावधीत पासपोर्ट संबंधीच्या कामाचे पुणे येथे प्रशिक्षण घेतले आहे़ नांदेडमध्ये पासपोर्ट प्राप्त होणार असल्याने शहरवासियांची मोठी गैरसोय दूर होणार आहे़

टॅग्स :passportपासपोर्टAshok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडAirportविमानतळ