शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

रेल्वेतील चो-यांनी प्रवासी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:38 IST

गुरुवारी नांदेडकडे येणा-या मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाईल, दागिने, बॅग आदी साहित्य लांबविले़ चोरी गेलेल्या बॅगमध्ये किडनी प्रत्योरापण झालेल्या रूग्णाची औषधी असल्याने एका महिला प्रवाशाने आरडाओरड केली़ तक्रार दाखल करण्यास परभणी स्थानकातील पोलीस सहकार्य करीत नसल्याने गाडी थांबविण्यात आली़ जोपर्यंत तक्रार घेणार नाहीत तोपर्यंत गाडी हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली़

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चो-यापोलिसांकडून तक्रारी घेण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गुरुवारी नांदेडकडे येणा-या मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाईल, दागिने, बॅग आदी साहित्य लांबविले़ चोरी गेलेल्या बॅगमध्ये किडनी प्रत्योरापण झालेल्या रूग्णाची औषधी असल्याने एका महिला प्रवाशाने आरडाओरड केली़ तक्रार दाखल करण्यास परभणी स्थानकातील पोलीस सहकार्य करीत नसल्याने गाडी थांबविण्यात आली़ जोपर्यंत तक्रार घेणार नाहीत तोपर्यंत गाडी हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली़रेल्वेस्थानक परिसरात बहुतांश ठिकाणी कॅमेरे बसविल्याने चोरट्यांनी काही दिवसांपासून आपला मोर्चा गाड्यांमध्ये वळविला आहे़ नंदीग्राम, तपोवन, सचखंडसह मराठवाडा एक्स्प्रेस अधूूनमधून चोरी झाल्याची नोंद ठाण्यात होते, परंतु मराठवाडा एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक डी-१० मध्ये गुरुवारी जवळपास आठ ते दहा जणांचे मोबाईल, पॉकेट, बॅग चोरट्यांनी लांबविले.सदर गाडीत प्रवास करणा-या एका वृद्ध महिलेची रेल्वेत वरील बाजूस ठेवलेली कापडी पिशवी चोरीस गेली़ यामध्ये रोख रकमेसह औषधी होती़ सेवानिवृत्त कर्मचारी डॉ़ए़बी़बेळकोणीकर आणि त्यांच्या पत्नी औरंगाबाद येथून नांदेडला येण्यासाठी बसले होते़बॅगमध्ये डॉ़ बेळकोणीकर यांची दर दोन तासाला घ्यावयाची औषधी असल्याने त्यांच्या पत्नीने घाबरून गोंधळ घातला़ परंतु, कोणीही बॅग परत केली नाही़दरम्यान, परभणी स्थानक आल्यानंतर डी-१० सह आजूबाजूचे डबे तपासण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली़ परंतु, त्यांनी नकार देत नांदेड ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला़ गाडी सुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबविली़पोलीस चढ्या आवाजात वृद्ध महिलेला बोलत आहेत़ हे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यासह महिलेने जोपर्यंत तक्रार नोंदवून घेत नाहीत तोपर्यंत रेल्वे पुढे जाणार नाही, असा पवित्रा घेतला़ यावेळी एका पोलीस कर्मचा-याने पुढे येत रेल्वेत बसून परभणी ते पूर्णा प्रवासादरम्यान पिशवी चोरी, मोबाईल चोरी झाल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या़डॉ़बेळकोणीकर यांनी ३० हजार रूपये रोख रक्कम, पाच हजार रूपयांचे कपडले असलेली बॅग चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांना दिली़ तर अन्य प्रवाशांनी मोबाईल चोरीस गेल्याचे लेखी दिले़टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीस प्रतिसादडॉ़बेळकोणीकर यांची बॅग चोरीस गेल्याची तक्रार परभणी स्थानकावर घेतली जात नसल्याने त्यांचे बंधू सुरेंद्र बेळकोणीकर यांनी रेल्वेच्या टोल फ्री १८००१११३२२ या क्रमांकावर फोनद्वारे तक्रार दिली़ त्यानंतर पूर्णा स्थानकावर गाडी आल्यानंतर पूर्णा ठाण्यातील कर्मचारी सदर डब्यात आले होते़ बेळकोणीकर यांनी पोलिसांच्या असहकार्याबद्दल स्टेट पोलीस कंट्रोल रूम, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा आयुक्त, सिकंदराबाद यांच्याकडेदेखील तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले़रेल्वे पोलिसांकडून चोरट्यांना पाठबळरेल्वेत चोरी झालेल्या घटनांविषयी तक्रारी देण्यास पुढे आलेल्या प्रवाशांना चढ्या आवाजात बोलून ठाण्याबाहेर काढले जाते़ त्यामुळे बहुतांश चोºयांची कागदोपत्री नोंदच येत नाही़ प्रवासादरम्यान नेमके कुठे चोरी झाली ही बाब प्रवाशांना माहिती नसते़ गाडीतून उतरल्यानंतर अथवा प्रवासात लक्षात येते़ परंतु, जिथे चोरी झाली तिथे तक्रार देण्याचा अजब सल्ला पोलिसांकडून दिला जातो़ तक्रार देण्यास गेलेल्या प्रवाशांनाच पोलीस असे प्रश्न विचारतात की त्यानेच चोरी केली की काय? असा प्रश्न पडतो़