शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल, जबलपूर गाडीच्या फेऱ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:52 IST

दक्षिण मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या नांदेड ते पनवेल विशेष गाडी आणि सिकंदराबाद ते जबलपूर मार्गे नांदेड विशेष गाडीच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार असून एकूण ३० फे-या घेण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़

ठळक मुद्देदक्षिण मध्य रेल्वे : विशेष गाडीची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दक्षिण मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या नांदेड ते पनवेल विशेष गाडी आणि सिकंदराबाद ते जबलपूर मार्गे नांदेड विशेष गाडीच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार असून एकूण ३० फे-या घेण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभगातून अनेक विशेष गाड्या चालविल्या जातात़ परंतु, बहुतांश गाड्या प्रतिसादाअभावी बंद केल्या जातात़ दरम्यान, नांदेड - पनवेल- नांदेड आणि सिकंदराबाद येथून नांदेडमार्गे जबलपूर गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर गाड्यांच्या फेºयांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ नांदेड येथून पुणे आणि पनवेलला जाण्यासाठी विशेष ४ फेºया वाढविण्यात आल्या आहेत़ यामध्ये गाडी संख्या०७६१७ नांदेड ते पनवेल विशेष गाडी नांदेड येथून ४ आणि ११ आॅगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी ५़ ३० वाजता सुटेल आणि परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद , पुणे मार्गे पनवेल येथे दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचेल. तर गाडी संख्या ०७६१८ पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल येथून ५ आणि १२ आॅगस्ट २०१८ रोजी रविवारी सकाळी १० वाजता सुटेल आणि पुणे, उस्मानाबाद, लातूर, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे दुसºया दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचेल. नांदेड येथून जबलपूर आणि सिकंदराबादला जाण्यासाठी विशेष गाडीच्या २६ फेºया वाढविण्यात आल्या आहेत़गाडी संख्या ०१७०३ सिकंदराबाद ते जबलपूर परतीच्या प्रवासात सिकंदराबाद येथून ३, १०, १७, २४, ३१ जुलै रोजी तर ७, १४, २१, २८ आॅगस्ट आणि ४, ११, १८, २५ सप्टेंबरला धावेल. सिकंदराबाद येथून दर मंगळवारी रात्री ८़३० वाजता सुटेल तर जबलपूर येथे सायंकाळी पोहचेल.---गाडीचे वेळापत्रक : प्रवाशांना दिलासायामध्ये गाडी संख्या ०१७०४ जबलपूर ते सिकंदराबाद विशेष गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री ८ वाजता निघेल. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड मार्गे दुसºया दिवशी ७ वाजता सिकंदराबादला पोहोचेल. ही गाडी जबलपूर येथून दिनांक जुलै महिन्यात २, ९, १६, २३, ३० तारखेला तर ६, १३, २०, २७ आॅगस्ट आणि ३, १०, १७, २४ सप्टेंबर रोजी धावेल. सदरची गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री ८ वाजता जबलपूर येथून सुटेल तर सिकंदराबाद येथे मंगळवारी रात्री ७ वाजता पोहोचेल.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वे