शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरात 6 हजारांवर भाडेकरू परप्रांतीय; घरमालकांनी केवळ 48 जणांची केली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:34 IST

नांदेड शहरात राहणार्या भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे घरमालकांना फारसे गरजेचे वाटत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देभाडेकरूंची नोंदणी करण्याचे आवाहन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्यांनाही दिले जाते घर भाड्याने

नांदेड :  शहरात हजारो परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील नागरिक घर भाड्याने घेवून राहतात. त्यापैकी अनेकांनी दुकाने भाड्याने घेवून व्यवसाय थाटले आहेत. परंतु, कोरोना महामारीने लाॅकडाऊन काळात हजारो भाडेकरूंनी घर, दुकाने सोडून आपल्या राज्यात जाणे पसंत केले. आजघडीला सहा हजारावर भाडेकरू हे परप्रांतीय असूनदेखील केवळ ४८ घरमालकांनी पोलीस ठाण्यात नोंद केलेली आहे. 

नांदेड हे शैक्षणिक, भाैगोलिक तसेच व्यावसायिकदृष्ट्या सोईचे आणि महत्वपूर्ण असल्याने बहुतांश राज्यातील नागरिकांनी नांदेडचे कायमस्वरूपी रहिवाशी होणेही पसंत केले आहे. त्यात त्यांच्या आश्रयाने येणारे हजारो परप्रांतीय हे भाड्याने घरे घेवून राहतात. यामध्ये बिहार, गुजरात, उत्तरप्रादेश, बंगाल, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील बहुतांश नागरिकांचा समावेश आहे. त्यात कोरोना काळात सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेमध्ये हजारो परप्रांतीयांनी परत आपल्या गावी जाणे पसंत केले. परंतु, नांदेड शहरात राहणार्या भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे घरमालकांना फारसे गरजेचे वाटत नसल्याचे चित्र आहे. जवळपास पावणेसात लोकसंख्या असलेल्या नांदेड शहरात केवळ ४८ घरमालकांनीच भाडेकरूंची माहिती नोंदविली आहे. परप्रांतीय तसेच अनोळखी व्यक्ती भाड्याने राहत असेल तर त्याचे ओळखपत्र, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणे आणि ती माहिती पोलीस ठाण्यात देणे कायद्याने गरजेचे आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. त्यामुळे घरमालकांनी कोणताही भाडेकरू ठेवत असताना त्याची सविस्तर माहिती ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सर्वाधिक बिहार, युपीचे  नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरूपैकी सर्वाधिक भाडेकरून हे युपी, बिहार आणि राजस्थानचे आहेत. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तेलंगना, बंगाल, गुजरातच्या नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश जण व्यवसाय, मजूरीच्या शोधात आलेले आहेत. 

घरमालक बिनधास्तघर भाड्याने देताना बहुतांश घरमालक बिनधास्त असतात. परजिल्ह्यातून अथवा परप्रांतातून आलेल्या भाडेकरूंची चाैकशी करण्यापेक्षा अधिक घरभाडे देणार्या भाडेकरूंना पसंती देण्याचा कल असतो. त्यामुळे त्यांच्याकडून ओळखपत्र घेणे अथवा भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे दुरच राहिले. माहिती न देणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. 

घरमालकाने भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे बंधनकारक आहे. परंतु, बहुतांश घरमालक याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा एखादी घटना, गुन्हा घडतो. तेव्हा त्यांना जाग येते. घर भाड्याने देताना संबंधीतांचे ओळखपत्र घ्यावे, त्याचे चारित्र्य तपासावे, तसेच सदर माहिती ठाण्याला देखील द्यावी.  - द्वारकादास चिखलीकर, पो. नि.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड