शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीत चारा पिके घेण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:28 IST

दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशय, तलाव या भागात रिकाम्या असलेल्या जमिनीवर चारा लागवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देनाममात्र दराने जमीन भाडेपट्ट्याने देण्यात येणार

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशय, तलाव या भागात रिकाम्या असलेल्या जमिनीवर चारा लागवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.२०१८-१९ च्या दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखाली, तलावाखालील जमीनीचा विनियोग फक्त चारा पीके घेण्याबाबत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण नांदेड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, नांदेड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प नांदेड सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे उपस्थित होते.कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग यांचे शासन निर्णयान्वये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य चाराटंचाई विचारात घेता गाळपेर क्षेत्रावर चारा पीकांचे उत्पादन करुन जनावरांसाठी चारा उत्पादन करण्याच्या दृष्टीने शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच चाराटंचाई निवारण्याकरीता लाभार्थी निवड, समन्वय व संनियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. जलाशयाखाली, तलावाखालील जमीन प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमीन मोकळ्या, उघड्या पडलेल्या आहेत. अशा जमिनीवर शेतकºयांना चारा पिके उत्पादनाकरीता वर्ष २०१८-१९ रबी व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र एक रुपया दराने भाडेपट्टयावर देण्यात येणार आहे. या गाळपेरा जमिनीवर चारा पिकांचे मका, ज्वारी, बाजरी व न्युट्रिफिड बियाणे पशुसंवर्धन विभागामार्फत विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज प्रत्येक तालुक्यांत पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती विस्तार यांचे स्तरावरुन स्वीकारण्यात येतील व अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. या योजनेत पशुधन पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड