शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सगरोळीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:31 IST

गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

नांदेड : गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मरखेलनजीक तपासलेल्या २७ वाळूच्या गाड्यांमध्ये बोगस पावत्या आढळल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी कारवाई करुनही या प्रकरणात संबंधित मात्र मोकळे असल्याचे वास्तव २ जून रोजी ‘लोकमत’ ने उघड केले होते.मुखेड येथील पाणीटंचाईची बैठक आटोपून देगलूरकडे मरखेलमार्गे जात असताना २ मे रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वाळूच्या गाड्यांची तपासणी केली होती. या तपासणीत गौण खनिज वाहतुकीच्या पावत्या त्यांनी तपासल्या होत्या. त्यात एक नव्हे, दोन नव्हे तर सात पावत्या बोगस आढळल्या.उर्वरित २० ट्रकचालक ट्रक जागेवरच ठेवून पळून गेले होते. त्यामुळे या संपूर्ण वाहनांच्या पावत्या बोगस असल्याचा प्रकार स्पष्ट झाला होता. ही वाहने देगलूर तहसीलने ताब्यात घेत दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरु होती. त्याचवेळी गौण खनिज वाहतुकीच्या बोगस पावत्या आल्या कुठून? हा मूळ प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत देगलूर प्रशासन चौकशीचा भाग हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याचे सांगत होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून स्थानिक प्रशासन या प्रकरणात कारवाई करत असल्याचे सांगत होते. एकूणच हा प्रकार टोलवाटोलवीचाच होता. खुद्द जिल्हाधिकारी यांनी कारवाई करुन एखाद्या प्रकरणात कारवाई होत नसेल तर अन्य प्रकाराकडे कानाडोळाच होत असल्याचे दिसून येत होते. या बाबत २ जून रोजी ‘लोकमत’ ने सदर प्रकारावर प्रकाश टाकला होता. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेत बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू घाट घेणाºया ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा गुन्हा दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बोगस पावत्या आल्या कुठून ? याचाही छडा लावण्यात येईल. बोगस पावत्या ट्रकचालकांनी आणल्या की ठेकेदाराने? याचा तपास सुरुच आहे. त्याचवेळी ठेकेदार हा घाटावरील सर्व बाबीला जबाबदार असल्याने त्याच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारीNanded policeनांदेड पोलीस