शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:52 IST

त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा निर्णय

नांदेड : नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़ घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते़ त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़२०१८ मध्ये नांदेडात पोलिस भरती घेण्यात आली होती़ १३ हजारांहून अधिक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले होते़ पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली ही भरती घेण्यात आली़ परंतु पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत काही तरी गैरप्रकार झाला असल्याचा संशय मीणा यांना आला होता़ यावेळी त्यांनी काही उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता, अनेक जणांना एकसमान गुण असल्याचे लक्षात आले़ तसेच अत्यंत अवघड असलेली उत्तरेही अनेक उमेदवारांनी सोडविली होती़ त्यानंतर मीणा यांनी या उमेदवारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलाविले़ यापैकी काही जणांना उत्तरपत्रिकेतील उत्तराबाबत विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही आणि त्यामुळेच या प्रकरणाचे बिंग फुटले़ या प्रकरणात उत्तर पत्रिका तपासणीचे काम करणाºयासंह अनेक उमेदवारांवर गुन्हा नोंदविण्यात आला़ त्यानंतर या प्रकरणाचा राज्यभर व्याप असल्याचे उघडकीस आले़ पोलिस महासंचालक कार्यालयाने नांदेडात घेण्यात आलेली लेखी परीक्षाच रद्द केली़ त्यानंतर नव्याने लेखी परीक्षा घेण्यात आली़ त्या परीक्षेच्या निकालानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले़ त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील १५, ओबीसी-२९, अनुसूचित जाती-६, अनुसूचित जमाती-५, एनटीसी-४ आणि अनुकंपा ७ अशा एकुण ६६ उमेदवारांचा समावेश आहे़ नियुक्त झालेले हे सर्व ६६ उमेदवार शुक्रवारी पोलीस मुख्यालयात हजर झाले होते़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेड