शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांना हक्काच्या घराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:05 IST

शहरामध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. परंतु, हक्काचे घर नाही. अशा नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरात हक्काचे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रत्येकी अडीचशे घरांच्या दोन प्रस्तावांना राज्य व केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. तर दीड हजार घरांच्या आणखी चार प्रस्तावांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. एकूणच सुमारे दोन हजार घरांचे प्रस्ताव मंजूर असून आणखी दोन हजार घरांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

ठळक मुद्देदोन हजार घरांना मंजुरी; दोन हजार घरांचे प्रस्ताव प्रक्रियेत

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरामध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. परंतु, हक्काचे घर नाही. अशा नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरात हक्काचे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रत्येकी अडीचशे घरांच्या दोन प्रस्तावांना राज्य व केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. तर दीड हजार घरांच्या आणखी चार प्रस्तावांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. एकूणच सुमारे दोन हजार घरांचे प्रस्ताव मंजूर असून आणखी दोन हजार घरांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.पंतप्रधान नागरी आवास योजनेच्या माध्यमातून विकासकांच्या सहभागाने दुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन आणि सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्राच्या भागिदारीतून स्वस्त व परवडणारी घरे लाभार्थीच्या पुढाकाराने बांधून देण्याची ही योजना आहे. लाभार्थी कुटुंबातील त्याच्या अथवा तिच्या नावावर तसेच कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर पक्के घर नसणाºयांना या योजनेतून घराचे बांधकाम करु इच्छिणाºयांसाठी २ लाख ५० हजार अनुदान मिळणार आहे. तर शहरात निवासी असलेल्या, परंतु किरायाने राहणाºया नागरिकांना खाजगी बिल्डरकडून घर खरेदी करताना याच पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरात मागणी सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानंतर स्वत: बांधकाम करुन घर बांधणाºया प्रत्येकी अडीचशे घरांच्या दोन प्रस्तावांना राज्य शासनाच्या सुकाणू समितीने मान्यता दिल्यानंतर ते केंद्राकडे पाठविण्यात आले होते. या दोन्ही प्रस्तावांना केंद्र शासनाच्या समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ५०० नागरिकांच्या घरबांधकामाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या लाभार्थ्यांनी घराच्या बेसमेंटपर्यंतचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना अडीच लाखांची रक्कम चार टप्प्यांत मिळणार आहे.याबरोबरच महानगरपालिकेने दीड हजार घरांचे आणखी चार प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले होते. सोमवारी म्हाडाच्या वतीने नागपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुकाणू समितीने या चारही प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे प्रस्ताव आता केंद्र शासनातर्फे नियुक्त समितीकडे पाठविण्यात येणार असून त्यांची मंजुरी मिळताच या दीड हजार घरांच्या बांधकामाचा मार्गही मोकळा होणार आहे. या योजनेमुळे हक्काच्या घरापासून वंचित असणाºया मोठ्या वर्गाला दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.---किरायादारांसाठी दोन कन्स्ट्रक्शन कंपन्यांचा पुढाकारशहरात किरायाने वास्तव्य असणाºयांना तयार घराची खरेदी करतानाही अडीच लाखांचे अनुदान मिळणार आहे. हडकोत होणाºया या प्रकल्पासाठी श्रद्धा कन्स्ट्रक्शनने एक हजार घरांचा प्रस्ताव दिला आहे तर इस्टोफा कन्स्को या पुणे येथील कंपनीनेही अशाच पद्धतीच्या घरासाठी २९० आणि ५८६ घरांचे दोन प्रस्ताव सादर केलेले आहेत. सद्य:स्थितीत हे दोन्ही प्रस्ताव राज्य शासनाकडे महानगरपालिकेने मंजुरीसाठी पाठविले असून स्वत: बांधकाम करुन देणाºया योजनेतून आणखी चार प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. या सर्व प्रस्तावांना केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यास या नागरिकांच्याही घराचा मार्ग प्रशस्त होणार आहे. या प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या वतीने शहर अभियंता माधव बाशेट्टी, उपअभियंता प्रकाश कांबळे यांच्यासह कनिष्ठ अभियंता खुशाल कदम आदींनी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :NandedनांदेडHomeघर