शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांना घरकुलांसाठी ‘आवास प्लस’ मधून संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:52 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घरकुल योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पात्र असूनही अनेक लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नसल्याचे सदस्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर आवास प्लसमध्ये अशा वंचितांना सामावून घेण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. यासाठी आता ३० सप्टेंबरपूर्वी आवास अ‍ॅपमधील नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देयोजना : ३० सप्टेंबरपूर्वी नोंदणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घरकुल योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पात्र असूनही अनेक लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नसल्याचे सदस्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर आवास प्लसमध्ये अशा वंचितांना सामावून घेण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. यासाठी आता ३० सप्टेंबरपूर्वी आवास अ‍ॅपमधील नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्वसाधारण सभेत पंचायत विभागावर चर्चा सुरु झाल्यानंतर या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांची चांगलीच कोंडी झाली होेती. विशेषत: जि. प. सदस्य प्रणिता चिखलीकर यांनी पंतप्रधान घरकुल योजना राबविताना कंधार तालुक्यात बोगस लाभार्थी घुसडल्याचा आरोप केल्याने या विषयावरुन सभागृहात गदारोळ माजला होता. यावेळी घरकुल योजनेपासून अनेक पात्र लाभार्थी वंचित राहिल्याचाही आरोप झाला होता. यावर प्रशासनाने पात्र असूनही ज्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नाहीत अशांना आवास प्लसमधून सामावून घेण्यात येईल, असे जाहीर केले होते.सदर आवास प्लसमध्ये घरकुलासाठी आता ३० सप्टेंबरपूर्वी नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या ग्रामसभांतून सुचविलेल्या सर्व कुटुंबांची नावे आवास प्लस अ‍ॅपमध्ये नोंदविण्यात येणार आहेत. जे अर्ज पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर स्तरावर जमा झाले ते ग्रामसभेसमोर ठेवून त्यांना संमती मिळवावी आणि संमती असलेल्या अर्जदारांची आवास प्लस मोबाईल अ‍ॅपमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हास्तरीय समितीने तालुका व जिल्हास्तरावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याची वरील कालावधीत दररोज डेटा संकलित करण्यासाठी नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या मुख्य घटकावरील येणाºया खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. याकरिता ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडे नांदेडसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्हास्तरावर समितीआवास प्लस अ‍ॅपमध्ये कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच या सर्वेक्षणाचे नियोजन व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांच्यासह प्रकल्प संचालक राहणार असून सदस्य सचिव म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा काम पाहील. याबरोबरच सर्वेक्षणाच्या एकूण संख्येनुसार रॅन्डम तपासणी करण्यात येईल.

टॅग्स :NandedनांदेडHomeघर