शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

खुल्या आकाशी मद्यपींचा मेळा; नांदेडात मोकळ्या जागा, बंद इमारतींना आले दारु खड्ड्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:56 IST

नांदेड शहरातील मोकळ्या जागा तसेच बंद इमारती, घरे ही मद्यपींसह जुगाºयांचा अड्डा बनला आहे़ विशेषत: शासकीय रूग्णालयासह बंद इमारत परिसरात दिवसाढवळ्या मद्यपींचा मेळा भरत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील मोकळ्या जागा तसेच बंद इमारती, घरे ही मद्यपींसह जुगाºयांचा अड्डा बनला आहे़ विशेषत: शासकीय रूग्णालयासह बंद इमारत परिसरात दिवसाढवळ्या मद्यपींचा मेळा भरत आहे़शहरातील वाईन शॉप, देशी दारूची दुकाने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बंद होत आहेत़, परंतु खुल्या आकाशी मद्यपी बसण्याची ठिकाणे दिवसेंदिवस वाढत आहेत़ यामध्ये शहरातील मोकळे भूखंड आणि शासकीय इमारती परिसरात मद्यपींचे टोळके बसलेले पहायला मिळत आहेत़ शहरातील वर्दळीच्या ठिकाणीदेखील बिनदिक्कतपणे हे मद्यपी बसत आहेत़ सोबत दारू, पाणी आणि चिवडा, फुटाणे असे साहित्य घेवून बसणाºया दारूड्यांनी शासकीय रूग्णालयाच्या गार्डनला गार्डन बारचे बनवले आहे़ बाजूला महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक असे अनेक शासकीय कार्यालये व न्यायालय परिसर आहे़ त्याचबरोबर वजिराबाद पोलीस ठाणेदेखील थोड्याच अंतरावर आहे़, परंतु या मद्यपींवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही़नांदेड शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा इतिहास सांगणाºया कलामंदिरालादेखील मद्यपींनी लक्ष्य केले आहे़ या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते, परंतु परिसरातील वर्दळ, वाहतूक पोलीस, आजूबाजूचे दुकानदार यांना न जुमानता मद्यपी सकाळ, दुपार, सायंकाळी त्यांना वाटेल त्यावेळी कलामंदिर परिसरातील ओटा, पायºया आणि पाठीमागच्या मोकळ्या मैदानावर आपले बस्तान मांडत आहेत़ सध्या या परिसरात स्वेटरची दुकाने आणि बाजूला महासेल आहे़ या ठिकाणी येणाºया महिला-मुलींची मद्यपी शिट्ट्या मारून, खाणा-खुणा करून छेड काढतात़जुना मोंढा परिसरातील टॉवरची हीच स्थिती आहे़ येथील गार्डनमध्ये पत्याचे डाव सुरू असतात़ ओट्यांवर मद्यपींचा मेळा भरतो़शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालय परिसर, नाना-नानी पार्क समोरील रस्ता, कॅनॉल रस्ता, विमानतळ रस्ता, आनंदनगर चौक, पावडेवाडी नाका परिसरातील मोकळी जागा, वर्कशॉप कॉर्नरचा पाण्याच्या टाकीचा परिसर आदी जागा मद्यपींचे अड्डे बनलेत.