शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

नांदेड जिल्ह्यात दोन वर्षात केवळ साडेसातशे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुटपुंजा निधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आॅनलाईन प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेला खिळ बसली असून १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळूनही दोन वर्षात केवळ ७४८ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना नावालाच उरली आहे़जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून घरकुलांचे बांधकाम कासवगतीने सुरू आहेत़ केंद्र शासनाची ...

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनाजिल्ह्यात १५ हजार ५७१ लाभार्थ्यांंना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुटपुंजा निधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आॅनलाईन प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेला खिळ बसली असून १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळूनही दोन वर्षात केवळ ७४८ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना नावालाच उरली आहे़जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून घरकुलांचे बांधकाम कासवगतीने सुरू आहेत़ केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेकडे पाहिले जाते़ या योजनेला २० नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रारंभ झाला़ ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे़ गोरगरीबांना आपल्या हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते़ या घरकुलात एक स्वयंपाक घर तसेच शौचालयाचा समावेश आहे़ २०११ च्या डाटामधून ग्रामसभेद्वारे या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते़ त्यानंतर चार टप्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत केला जातो़ लाभार्थ्यांना पहिला हप्ता ३० हजार तसेच दुसरा,तिसरा व चौथ्या टप्यातही ३० हजार रूपये असे एकुण १ लाख २० हजार रूपये दिले जातात़ जिल्ह्यासाठी १७ हजार ९३२ घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे़ दोन वर्षात केवळ ७४८ घरकुले पूर्ण झाले आहेत़लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असली तरी त्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ आॅनलाईन प्रक्रियेत अनेकांची अर्ज त्रुटीत निघाले असून अपुºया कागदपत्रामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे़ वाढत्या महागाईच्या काळात केवळ १ लाख २० हजार रूपयात घर बांधणे अशक्य झाले आहे़ विट, सिमेंट, वाळू यांचे भाव वाढले आहेत़ त्यात पहिला हप्ता ३० हजार रूपयाचा मिळत असल्याने पायाभरणीसाठी हा निधी अपुरा पडत आहे़ त्यामुळे घरकुलाचे बांधकाम दुसºया टप्यातच रेंगाळत आहे़ दुसºया हप्ताही ३० हजार रूपयांचा असल्याने बांधकामाला गती मिळत नाही़ त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही योजना डोकेदुखी ठरत आहे़ अनेकांना घर बांधण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे़४ घरकुल मंजुरी -अर्धापूर - २३०, भोकर-७६८, बिलोली- २०७४, देगलूर -१४०१, धर्माबाद -५८१, हदगाव -४२९, हिमायतनगर -६२५, कंधार -११०१, किनवट- १३२३, लोहा-८२४,माहूर - ७६८, मुदखेड- ४९४, मुखेड- २३००, नायगाव- १८४१, नांदेड -३६०, उमरी - ४५२़४बांधकाम पूर्ण झाले- अर्धापूर -३३, भोकर - ७, बिलोली- ७५, देगलूर -५२, धर्माबाद -६५, हदगाव -८, हिमायतनगर -९७, कंधार -२१, किनवट- ५१, लोहा-७, माहूर -६२, मुदखेड-२५, मुखेड-७३, नायगाव -३९, नांदेड-१२७, उमरी- ६़