शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईलवरच रेल्वे तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:58 IST

रेल्वे प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अ‍ॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी दिली़

ठळक मुद्दे१५ जुलैपासून डाऊनलोड करा अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रेल्वे प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अ‍ॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी दिली़रेल्वे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी अथवा एटीव्हीएम मशीनसमोर रांगेत थांबूनच तिकीट घ्यावे लागत होते़ त्याचबरोबर स्थानकात येण्यास उशीर झाल्यास मोठ्या रांगेत उभे राहून तिकीट मिळविणे कठीण असल्याने अनेकवेळा विनातिकीट प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत होती़ त्यातच तिकीट निरीक्षक अथवा विशेष पथकाने तपासणी केल्यास दंड अथवा शिक्षेस सामोरे जावे लागत होते़ परंतु, स्मार्ट फोनचा वाढता वापर लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपद्वारे कॅश आणि पेपरलेस तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार रेल्वे प्रशासनाने युटीएस नावाचे एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे़ या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवरच तिकीट काढता येणार आहे आणि तेच तिकीट दाखवून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे़---असे वापरा ‘युटीएस’अनारक्षित तिकीट घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट फोनमध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर स्वत:ची माहिती जसे- आपला मोबाईल क्रमांक, नाव, जन्मतारीख, ओळखपत्र आदी माहिती भरून नोंदणी करावी लागेल़ सुरक्षिततेसाठी पासवर्ड पण देता येईल़ त्यानंतर आर-वॉलेट तयार होईल़ त्यातून तिकिटाचे पैसे द्यायचे आहेत़ या आर- वॉलेटला आॅनलाईन रिचार्ज करता येईल़ शंभर रूपयांपासून ते १० हजार रूपयापर्यंतचे रिचार्जची सुविधा उपलब्ध असल्याचे वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी सांगितले़ सदर अ‍ॅपच्या माध्यमातून १ ते चार जणांचे सर्वसाधारण तिकीट काढता येवू शकणार आहेत़---मोबाईल अ‍ॅपचे फायदेसदर मोबाईल अ‍ॅप दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांना वापरता येणार असून स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंत तसेच रेल्वेस्थानकापासून किमान १५ मीटर दूर अंतरावरून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसाधारण, सीजन, फलाट फार्म तिकीट, द्वितीय श्रेणी तिकीट काढता येवू शकते़ परंतु, एकदा काढलेले तिकीट रद्द करता येत नाही़ त्याचबरोबर रेल्वेस्थानकापासून १५ मीटर अंतरापर्यंत सदर अ‍ॅपचा उपयोग घेवून तिकीट काढता येत नाही़ त्यामुळे किमान १५ मीटर दूर असणे गरजेचे आहे़ तिकीट तपासणीसांना वेगळे अ‍ॅप दिले असून ते त्याद्वारे तिकीट तपासणी करू शकतात़

टॅग्स :NandedनांदेडMobileमोबाइलrailwayरेल्वे