शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नांदेड महापालिकेची केळी मार्केटमधील व्यापाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:55 AM

जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देथकीत भाड्यासाठी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे एकूण ४४ गाळे आहेत. त्यातील २४ गाळे हे फळ विक्रेत्यांना भाड्याने दिले आहेत. २० गाळे अद्यापही रिकामे आहेत. रिकामे असलेले गाळे भाजीपाला विक्रेत्यांना देण्याबाबत महापालिका धोरण ठरवित आहे. त्याचवेळी दोन वर्षांपासून भाडे थकलेल्या २४ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. सदर गाळेधारक हे फळ विक्रेते आहेत.केळी मार्केट येथून फळमार्केट विमानतळ परिसरातील म्हाळजा येथे दोन वर्षापूर्वी स्थलांतरीत झाले होते. या स्थलांतरानंतर गाळेधारकांनी केळी मार्केट येथील गाळे हे आपल्या ताब्यात ठेवले.विमानतळ परिसरातील सुरक्षेला धोकादायक असल्याच्या कारणावरुन महापालिकेने म्हाळजा परिसरातील फळ मार्केट हटविले.फळ तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेचा शोध घेतला जात असताना दुसरीकडे थकीत असलेले भाडे वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी सदर दुकानांवर नोटीस डकवल्या आहेत. यामध्ये थकीत भाडे हे नवीन दरानुसार भरण्यासही सूचित करण्यात आले आहे. यापूर्वी सदर दुकानांना अडीच हजार रुपये भाडे होते.आता नव्या दराप्रमाणे गाळेधारकांना ८ हजार रुपये भाडे भरावे लागणार आहेत. या भाडेवाढीस फळ विक्रेत्यांनी विरोध केला आहे. इतके दिवस दुकाने बंद असताना आता नव्या दराप्रमाणे भाडे भरणे शक्य नसल्याचे व्यापाºयांनी म्हटले आहे. पण महापालिकेने आता स्पष्ट भूमिका घेत नव्या दराप्रमाणे भाडे ंआकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपाकडून या गाळ्यासंदर्भात निश्चितच भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गाळेधारक आता हे थकीत भाडे कधी भरतील हा प्रश्न आहे. भाडे न भरल्यास मनपाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल.---भागिदारधारकांसाठी अभय योजनाशहरात महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये जे गाळेधारक भागिदारीमध्ये व्यवसाय करतात अशा भागिदारधारकांसाठी महापालिकेने नाव परिवर्तनासाठी अभय योजना घोषित केली आहे. व्यापारी संकुलामध्ये भाडेपट्यावर देण्यात आलेले गाळे व मनपा मालकीच्या जागेमध्ये जे गाळेधारक भागिदारीत व्यवसाय करतात.सदर जागेच्या चालू बाजारभावाप्रमाणे एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम मनपात जमा करावी लागणार असून रक्कम जमा केल्यानंतरच नाव परिवर्तन होईल. व्यापारी संकुलामधील गाळेधारकांनी भागिदारी संपुष्टात आल्यानंतर सदर दुकान भागिदाराच्या नावे आल्यास त्याच्या नावे करण्यासाठी अर्ज करावे, असे महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक स. अजितपालसिंघ संधू यांनी कळविले आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका